Friday, March 29, 2024
Homeदेश‘या’ मराठी अधिका-याला देशाच्या लष्करप्रमुखपदाचा मान

‘या’ मराठी अधिका-याला देशाच्या लष्करप्रमुखपदाचा मान

Manoj Mukund Na, army chief, army, indian armyrvaneवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडेंनी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कारण, देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर ४० वर्षानंतर लष्कराचे नेतृत्व मराठी व्यक्तीकडे आले आहे.

नरवणे यांची काही महिन्यांपूर्वीच लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्कर प्रमुख असतील असं म्हटलं जात होतं. नरवणे हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यामुळे नवे लष्कप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. रावत हे 31 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. आपल्या 37 वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये उत्तम काम केलंय. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्धी आहेत.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 1980 मध्ये शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या 7व्या बटालियनमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे विद्यार्थी…

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे पुण्यातल्या ज्ञानप्रबोधीनीचे विद्यार्थी आहेत. त्यांचे वडिलही हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments