अयोध्याप्रकरणी ‘या’ संघटनेची न्यायालयात फेरविचार याचिका

- Advertisement -

Maharashtra political crisis: All eyes on Supreme Court todayनवी दिल्ली : अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात जमियत उलेमा ए हिंदने फेरविचार याचिका दाखल केली आहे. अशी माहिती संघटनेचे प्रमुख मौलाना अर्शद मदनी यांनी सांगितले.

न्यायालयानेच आम्हाला फेरविचार याचिका दाखल करण्याचा अधिकार दिला आहे असे मदनी म्हणाले. जमियत प्रमाणेच ऑल इंडिया मुस्लिम पसर्नल लॉ बोर्ड लवकरच फेरविचार याचिका दाखल करणार आहे. आम्ही आजच फेरविचार याचिका दाखल करणार नाही. आम्ही आमची फेरविचार याचिका तयार केली आहे. ९ डिसेंबरपूर्वी आम्ही केव्हाही याचिका दाखल करु असे ऑल इंडिया मुस्लिम पसर्नल लॉ बोर्डाचे जफरयाब जिलानी यांनी सांगितले.

मशिदीची जमीन अल्लाहच्या मालकीची आणि शरीयाच्या अधिपत्याखाली असल्याने ती कोणालाही दिली जाऊ शकत नाही, असे मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे जफरयाब जिलानी यांनी मागच्या महिन्यात बोर्डाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले होते. अयोध्येत मशिदीच्या बदल्यात पर्यायी जागा स्वीकारण्यास बोर्डाचा तीव्र विरोध आहे, असे जिलानी म्हणाले होते.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here