Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
HomeदेशVIDEO: दोन तरुणांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल ओतले!

VIDEO: दोन तरुणांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल ओतले!

Nagaurनागौर (राजस्थान) : दोन मागासवर्गीय तरुणांवर चोरीचा आरोप करुन त्यांना पाच जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर पेट्रोल ओतून स्क्रू ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला इजा करण्यात आली. या संतापजनक प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी पाज जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानच्या नागौर जिल्हामध्ये पच्चूराई पोलीस स्थानकाच्या हद्दीत गॅरेजमध्ये दोन मागासवर्गीय तरुण गाडीची सर्व्हिसिंग करुन घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी या दोघांवर पैसे चोरी केल्याचा आरोप केला. त्यानंतर या दोघांना कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. या दोघांचे हात पाय बांधून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांपैकी एकाची पॅण्ट काढण्यात आली. त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलमध्ये बुडवलेला स्क्रू ड्रायव्हर घुसवून त्याचा छळ करण्यात आला. हे दोघेही “आम्ही चोरी केली नाही”, असं सांगत द्येची याचना करत होते. मात्र गॅरेजमधील कर्मचारी त्यांना मारहाण करत होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

मारहाण, छळ करणा-या या तरुणांना झाली अटक…

सात तरुणांनी दोन मागासवर्गीय तरुणांना मारहाण केली होती. १६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भीमसिंग, आइदान सिंग, जासूस सिंग आणि सवाईसिंग यांच्यासहीत सात आरोपींचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणातील एकूण सात आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

तातडीने कारवाई करुन न्याय मिळवून द्यावा- राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “राज्य सरकारने या प्रकरणामध्ये तातडीने कारवाई करावी आणि या प्रकरणात न्याय मिळवून द्यावा,” असे ट्विट राहुल यांनी केलं आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments