Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeदेशअविवाहित स्त्री-पुरुष युगुल हॉटेलमध्ये एकत्र राहू शकतात; न्यायालयाचा निकाल

अविवाहित स्त्री-पुरुष युगुल हॉटेलमध्ये एकत्र राहू शकतात; न्यायालयाचा निकाल

Madras high courtचेन्नई: अविवाहीत स्त्री-पुरुष हॉटेलमध्ये एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष युगुलाला रुम नाकारणाऱ्या हॉटेलांना दणका मिळाला आहे.

प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही…

‘विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा दोन सज्ञान अविवाहित जोडप्याने (महिला आणि पुरुष) हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा ठरु शकत नसल्याचं मद्रास हायकोर्टाने स्पष्ट केलं.

तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये याचिकाकर्ता एक सर्व्हिस अपार्टमेंट चालवत होता. पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पथकाने 25 जून रोजी अपार्टमेंट परिसरात छापेमारी केली. त्यावेळी एका खोलीत मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. या खोलीत एक सज्ञान महिला आणि पुरुष राहत होते, मात्र त्यांचा एकमेकांशी विवाह झालेला नव्हता. त्यानंतर संबंधित पथकाने कोणतीही नोटीस न देता परिसर सील केला. त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला.

सर्व्हिस अपार्टमेंटला सील ठोकताना आपली बाजू ऐकून न घेतल्याचा दावा याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. सोशल मीडियावर वायरल झालेल्या बातमीचा आधार घेत कारवाई केल्याचा आरोपही याचिकाकर्त्याने केला होता. बूकिंग रजिस्टरमध्ये खोलीत राहणाऱ्या स्त्री-पुरुषाचा कोणताही तपशील नव्हता. त्यामुळे या खोलीत अवैध व्यवहार चालत असावेत, असं पीलामेदू पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना तहसीलदारांनी सांगितल्याचं सरकारतर्फे म्हटलं.

अविवाहित जोडप्याला खोली देणं हे अनैतिक असल्याचं कोर्टात सादर केलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. परंतु अविवाहित जोडप्याला खोली दिल्याने कायद्याचं उल्लंघन कसं होतं, या कोर्टाच्या प्रश्नाचं उत्तर सरकारी पक्षाला देता आलं नाही. यामुळे युगुलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments