Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशअखेर उन्नावच्या अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज संपली!

अखेर उन्नावच्या अत्याचार पीडितेची मृत्यूशी झुंज संपली!

Unnao rape victim who burnt

कानपूर : आपल्यावर अत्याचार करणा-या आरोपी विरोधात पोलीस कारवाई करत नाही म्हणून पीडितेने स्वत: ला जाळून घेतले होते. उन्नावच्या पोलीस अधीकक्षांच्या कार्यालयाबाहेर जाळून घेणाऱ्या अत्याचार पीडितेचा कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत्यू झाला आहे.

अत्याचार करणारा आरोपी अनधेश सिंग यांविरोधात दिलेल्या तक्रारीवर पोलीस कारवाई करत नसल्याचा या युवतीचा (२३) आरोप होता. आरोपी अनधेश सिंगने आपल्याशी लग्न करणार असल्याचे वचन दिले होते, मात्र, नंतर त्याने संबंध नाकारले होते, असे युवतीचे म्हणणे होते. या प्रकारानंतर आरोपी अवधेश सिंग याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टात त्याला अंतरिम जामीन मिळाला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले होते.

आत्मदहनानंतर ही युवती ८० टक्के भाजली होती…

आत्मदहनानंतर ही युवती ८० टक्के भाजली होती. तिला १६ डिसेंबर या दिवशी कानपूरमधील लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आत्मदहनानंतर या युवतीची श्वास नलिका आणि पोटाला सूज आली होती. शनिवारी सकाळपासून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १६ डिसेंबरला पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतून या युवतीने स्वत:ला जाळून घेतले होते. त्यानंतर आगीच्या ज्वाळांसह ती युवती कार्यालतही शिरली होती. अखेर त्या पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments