Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेश'न मिळाल्या मुलांना शाळा, न लोकांना रुग्णालय,कोठे गेले ५५ हजार कोटी'

‘न मिळाल्या मुलांना शाळा, न लोकांना रुग्णालय,कोठे गेले ५५ हजार कोटी’

नवी दिल्ली – दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या ९ डिसेंबर रोजी होत आहे. राज्यात भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. २२ वर्षापासून सत्तेत असणारी भाजप आपली सत्ता राखण्यासाठी मैदानात असेल तर काँग्रेस राज्याची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी पूर्ण जोर लावत आहे.

निवडणुकीत आपली बाजू मांडण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दररोज एक प्रश्न विचारून त्यांना निशाण्यावर घेत आहेत. आज राहुल यांनी पंतप्रधांनाना दहावा प्रश्न विचारला आहे. यामध्ये राहुल यांनी आदिवासींची जमीन हिसकावून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की लोकांचा जंगलावर अधिकार राहिला नाही. मुलांना शाळा मिळत नाहीत व लोकांना रुग्णालय मिळत नाही.

त्याचबरोबर वाढत्या बेरोजगारीवर प्रश्न उपस्थित करून राहुल यांनी म्हटले आहे, की  न बेघरांनी घर मिळाले न तरुणांनी रोजगार. राहुल यांनी मोदींना सवाल केला आहे, की वनबंधु योजनेचे ५५ हजार कोटी गेले कोठे ?
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना आपला नववा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये म्हटले होते, की पंतप्रधान शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments