Friday, March 29, 2024
Homeदेशभाजपकडून टिक टॉक स्टार सोनाली फोगाट ला विधानसभेचं तिकीट

भाजपकडून टिक टॉक स्टार सोनाली फोगाट ला विधानसभेचं तिकीट

Sonali Phogatचंदीगढ (हरयाणा) : भाजपाने हरियाणामध्ये टिक टॉक स्टारला विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सोनाली फोगाट असं या टिक टॉक स्टारचं  नाव आहे. सोनालीला भाजपने माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा आणि माजी खासदार कुलदीप बिश्नोईंच्या विरोधात आदमपूर मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरवले आहे. सोनालीचे टिक टॉकवर एक लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी सोनाली अभिनेत्री होती आणि काही सीरिअलमध्ये तिने काम केले आहे. टिक टॉकवर मोठ्या प्रमाणात तिचा चाहता वर्ग आहे. दररोज ती टिक टॉकवर अनेक नव-नवे व्हिडीओ बनवते. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्येही वाढ होत आहे.

सोनाली फोगाट हिचे पती संजय फोगाट हे भाजपचे नेते होते. त्यांचा 2016 मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्यांच्याच फार्म हाऊसवर त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सोनिलीही भाजपासोबत जोडल्या गेली होती.

हिसार जिल्ह्यांत येणारा आदमपूर मतदारसंघ भजनलाल कुटुंबाचा गड आहे. भजनलाल कुटुंबाच्या एकाही सदस्याला या मतदारसंघातून कधी पराभवाचा सामना करावा लागला नाही. स्वत: कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. 2014 मध्ये कुलदीप बिश्नोई या मतदारसंघातून विजयी झाले. 1967 रोजी भजनलाल यांनी येथून पहिली निवडणूक लढवली होती.

दरम्यान, 2014 रोजी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरयाणात पूर्ण बहुमत मिळाले होते. तेव्हा भाजपने राज्यात 47 जागांवर विजय मिळवला होता. तेव्हा राज्यात काँग्रेफक्त 15 जागांवर विजय मिळवू शकली. आता टीक टॉक स्टार सोनाली फोगाट कुलदीप बिश्र्नोईंना टक्कर देईल का याकडे सर्वोंचे लक्ष लागले आहे. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments