Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशग्राहाकांना फटका : सलग आठवडाभर बँकांचे व्यवहार होणार ठप्प !

ग्राहाकांना फटका : सलग आठवडाभर बँकांचे व्यवहार होणार ठप्प !

देशातील दहा सार्वजनिक बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी चार प्रमुख बँक संघटनांनी येत्या २६ व २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. मात्र चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्टीला जोडून हे आंदोलन होणार असल्याने बँकांचे व्यवहार ठप्प पडण्याची चिन्हे आहेत.

सोमवारी, ३० सप्टेंबरला अर्ध वार्षिक हिशेबासाठी बँक शाखांचे दरवाजे ग्राहकांना नियमित व्यवहारासाठी बंद असतील. मंगळवारचा (१ ऑक्टोबर) अपवाद केल्यास बुधवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंतीनिमित्त सुटीमुळे बँकांचे व्यवहार होणार नाहीत.

‘एआयबीओसी’, ‘एआयबीओए’, ‘आयएनबीओसी’ व ‘एनओबीओ’ या चार बँक कर्मचारी तसेच अधिकारी संघटनांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यानंतर ‘आयबीए’ या बँक व्यवस्थानाच्या संघटनेनेही बँकांचे व्यवहार संपामुळे विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे बॅंकांच कामकाज आधीच उरकून घ्यावे लागणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments