ख्रिस गेल म्हणाला ‘थँक्यू PM मोदी’, भारताच्या जनतेचंही केलं कौतुक; पाहा व्हिडिओ…

- Advertisement -
west-indies-cricketer-chris-gayle-says-thank-you-to-pm-modi-for-corona-virus-vaccines
west-indies-cricketer-chris-gayle-says-thank-you-to-pm-modi-for-corona-virus-vaccines

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा क्रिकेटर  ख्रिस गेल  याने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कोरोना व्हॅक्सिन वेस्ट इंडिजला पाठवल्यामुळे ख्रिस गेलने आनंद व्यक्त केला असून भारत सरकार, भारताची जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय.

गेलने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारताचे आभार मानले. जमैकामधील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा १७ सेकंदांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “करोना व्हॅक्सिन दान केल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेचे खूप आभार मानतो…आम्ही याचं कौतुक करतो….लवकरच भारतात येईल…पुन्हा एकदा व्हॅक्सिनसाठी खूप खूप आभारी आहोत”, असं गेलने म्हटलंय.

- Advertisement -

जमैकाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारचे आभार मानले

गेलने गुरुवारी जमैकात भारतीय उच्चायुक्त आर. मसाकुई यांची दूतावासात जाऊन भेटही घेतली. दरम्यान 8 मार्च रोजी भारत सरकारने जमैकाला अ‍ॅस्ट्राझेनेका व्हॅक्सिनचे ५० हजार डोस पाठवले. त्यानंतर जमैकाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारचे आभार मानले होते. अत्यंत आवश्यक सहकार्य केल्याबद्दल भारताचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया देत त्यांनी भारताचं आणि भारताच्या जनतेचं कौतुकही केलं होतं. आता गेलनेही भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे व्हॅक्सिनसाठी आभार मानले आहेत.

- Advertisement -