Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशनवीन अटी स्वीकारा नाहीतर WhatsApp अकाउंट Delete करा !

नवीन अटी स्वीकारा नाहीतर WhatsApp अकाउंट Delete करा !

नवी दिल्ली l नवीन वर्षापासून कंपनीची नवीन प्रायव्हसी पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सना आपल्या व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटचा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अटी स्वीकारणं अनिवार्य असेल. नवीन अटींबाबत अद्याप व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपबाबतचे सर्व अपडेट्स ट्रॅक करणाऱ्या WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे.

WABetaInfo ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. जर आमच्या अटी स्वीकारायच्या नसतील तर युजर्स त्यांचं व्हॉट्सअ‍ॅपचा अकाउंट डिलीट करु शकतात, असं या स्क्रीनशॉटमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा ची नवीन प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारी 2021 पासून लागू होणार आहे. याशिवाय, The Independent च्या रिपोर्टमध्येही 8 फेब्रुवारीपासून व्हॉटसअ‍ॅपचा वापर करण्यासाठी युजर्सना कंपनीची नवीन पॉलिसी स्वीकारावीच लागेल, अन्यथा त्यांना अकाउंटचा वापर करता येणार नाही, असं म्हटलंय.

WABetaInfo ने आपल्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन अटींमध्ये नववर्षात युजर्सच्या डेटाचा वापर कशाप्रकारे केला जाईल याचीही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय फेसबुक बिजनेससाठी तुमची चॅट कशाप्रकारे मॅनेज केली जाईल याबाबतही माहिती देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments