Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशकोण बनेगा मुख्यमंत्री ? 'हे' आहेत चर्चेतील नेते!

कोण बनेगा मुख्यमंत्री ? ‘हे’ आहेत चर्चेतील नेते!

नवी दिल्ली – गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये अथक प्रयत्नांनंतर भाजपने सत्ता तर काबीज केली. मात्र आता भाजप पुढे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचे. विजय रुपाणी यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला. परंतु भाजपा धुमल यांना संधी देऊ शकतो अशी चर्चापक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर सुरु आहे.

भाजपने किल्ला जिंकला आहे. आता त्यांना किल्लेदार नेमायचा आहे. भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी असा चेहरा हवा आहे. जो पक्षातील नेत्यांचा, आमदारांचा विश्वास संपादन करेल. ज्याचा फायदा पक्षाला २०१९ लोकसभा निवडणुकीमध्ये होईल.
हिमाचलमध्ये निवडणुकीची धुरा भाजपने प्रेमकुमार धुमल यांच्यावर सोपावली होती. तर गुजरातमध्ये मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी होती. मात्र हिमाचलमध्ये गड आला पण सिंह गेला अशी गत भाजपची झाली. भाजपने बहुमत मिळवले मात्र, प्रेमकुमार धुमल यांचा पराभव झाला. तर गुजरातमध्ये रुपाणी रडत कडत जिंकले. यामुळे दोन्ही राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे दावेदारच मागे पडले. यामुळे आता मुख्यमंत्री कोणाला करायचे ? असा प्रश्न भापजसमोर आहे. यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे पक्षांतर्गत निरिक्षण सुरू आहे. यासाठी बैठकही बोलावण्यात आली आहे.

गुजरातमध्ये कोण असेल मुख्यमंत्री 
रुपाणी यांचे मुख्यंत्रीपदाचे तिकीट जेमतेम कापले आहे. भाजप गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचेही नाव चर्चेत आहे. तर दुसरे नाव आहे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया. मांडविया हे पाटीदार समाजाचे असून ते शेतकरी ही आहेत. तर तिसरे नाव वजुभाई वाला, वजुभाई हे सध्या कर्नाटकाचे गव्हर्नर आहेत. ते क्षत्रिय समाजाचे असून त्यांची सौराष्ट्रावर मजबूत पकड आहे. आता या तीन नेत्यांमध्ये कोणाचे नाव वर्णी लागणार हे काळच ठरवेल.

हिमालच प्रदेशमध्ये कोण असेल मुख्यमंत्री  
धुमल यांच्या पराभवानंतर हिमाचलमध्ये इतर नेत्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आशा पल्लवीत झाल्या आहेत. यात पहिले नाव आहे ते राम ठाकूर यांचे. राम ठाकूर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. तसेच काल त्यांना पक्षाने दिल्लीलाही बोलावून घेतले आहे. तर दुसरे दावेदार आहेत ते आरएसएसशी संबध असलेले अजय जामवाल, यांच्यासोबतच केद्रींय मंत्री जेपी नड्डा यांचेही नाव चर्चेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments