होम देश येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

26
0

कर्नाटक: कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी बी.एस. येडियुरप्पा विराजमान झाले आहेत. ऐतीहासीक निकाल भाजपच्या बाजुने लागल्याने येडियुरप्पा ठरले मुख्यमंत्रीपदाचे दावेदार. सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री झालेल्या युक्तीवादानंतर अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी सरकार राखण्यासाठी त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. आता कर्नाटकात येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करावं लागलं आहे. एकट्या बी.एस. येडियुरप्पा यांनी शपथ घेतली आहे.

भाजपकडे सध्या १०४ आमदारांचं पाठबळ आहे. बहुमतासाठी त्यांना आणखी ८ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. दोन अपक्ष आणि बीएसपीच्या एका आमदाराने त्यांना पाठिंबा दिला तर हा आकडा १०७ पर्यंत पोहोचेल. त्यामुळे त्यांना आणखी ५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज पडणार आहे. मात्र पाच आमदारांचा पाठिंबा मिळवणं कठिण असल्यानं येडियुरप्पा त्यात यशस्वी होणार की नाही याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.