Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeदेशयेडियुरप्पा सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

येडियुरप्पा सरकारच्या भवितव्याचा आज फैसला

B S Yediyurappa,Yediyurappaबंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या सरकारचं भवितव्य आज सोमवार 9 डिसेंबर रोजी ठरणार आहे. विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार असून त्यातल्या किमान 7 जागांवर विजय मिळवणं बहुमतासाठी येडियुरप्पा यांना आवश्यक आहे.

कर्नाटकातलं कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर येडियुरप्पा यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. आज सोमावरी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सहा जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे निकालाकडे येडियुरप्पा सरकारचं लक्ष लागलं आहे. आधिच भाजपच्या हातून मोठी आणि महत्त्वाची राज्य गेल्यामुळे आता कर्नाटकात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 डिसेंबरला या 15 जागांवर मतदान झालं होतं. 67.91 एवढी मतदानाची टक्केवारी होती. हायकोर्टात सुनावणी असल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक झाली नव्हती. येडुरप्पा सरकारने 29 जुलैला विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

कर्नाटक विधानसभेत एकूण जागा 225 आहेत. मात्र त्यातल्या 17 सदस्यांना अपात्र ठरवल्यामुळे सख्या 208 वरच आली होती. कर्नाटक विधानसभेत भाजपला 105, जेडीएसला 34 तर काँग्रेसला 66 जागा आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments