Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशअमित शाह, भाजपाच्या ‘येडियुरप्पा सरकारला’ भ्रष्ट बोलून बसले!

अमित शाह, भाजपाच्या ‘येडियुरप्पा सरकारला’ भ्रष्ट बोलून बसले!

महत्वाचे…
१. येडियुरप्पा भ्रष्टाचारी सरकारच्या पारितोषिकाचे मानकरी
२. चुक सुधारली परंतु,काँग्रेसच्या सिद्धरामय्या यांनी धन्यवाद मानले
३. शहांच्या विधानावरुन काँग्रेसमध्ये आनंद,भाजपात नाराजी


कर्नाटक: कर्नाटकमध्ये निवडणुका जाहीर झाल्या. प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं सरकारी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप भाजपा करत आहे. आज, निवडणुकांसदर्भात पत्रकारक परिषदेत बोलताना भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला दिला. अमित शाह म्हणाले, “सुप्रीम कोर्टाच्या एका निवृत्त न्यायाधीशांनी असं म्हटलं होतं की, भ्रष्टाचारासाठी कुठलं सरकार पात्र असेल तर ते येडियुरप्पांचं सरकार.यामुळे शहा यांनीच पक्षाला अडचणीत आणल्याने भाजपातच खळबळ उडाली आहे.

शहा यांच्या तोंडातून येडियुरप्पांच्या बद्दल जे काही बाहेर आलं, त्याच क्षणी शेजारी बसलेल्या व्यक्तिनं चूक निदर्शनास आणली असून शाह यांनी लगेच चूक सुधारत सिद्धरामय्या सरकार अशी दुरूस्ती केली. अर्थात, व्हायचं ते नुकसान होऊन गेलं. सिद्धरामय्या यांनी लगेच सदर वक्तव्य ट्विट करत शाह यांचे धन्यवाद मानले आहेत. तुम्ही अखेर सत्य वदलात असे उद्गार सिद्धरामय्या यांनी काढले आहेत.
कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात १२ मे रोजी मतदान होणार असून १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या हातात असलेल्या मोजक्या राज्यांमध्ये कर्नाटक असून ते जिंकण्यासाठी भाजपा जीवाची बाजी लावणार असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आज घडल्या तशा प्रत्येक चुका उचलून धरण्यास काँग्रेस उत्सुक असेल हे ही दिसून येत आहे.
भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये चांगला कारभार असल्याचा प्रचार शाह यांनी सुरू केला आहे. गुजरात, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये १५ वर्षे बाजपाची सत्ता आहे आणि या राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या अत्यंत कमी असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे.

जर भ्रष्टाचारासाठी कुठल्या सरकारला बक्षीस द्यायचं असेल तर ते येडियुरप्पा सरकारला द्यायला हवं असं चुकून अमित शाह बोलून बसले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments