मीठ-पाण्याच्या सेवनाने अनेक आजारांपासून बचाव

0

कामाच्या धावपळीत अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराचेही प्रमाणही वाढतात. त्यामुळे प्रत्येक जण तंदुरुस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक आजारांपासून लांब राहण्यासाठी नियमित काळ्या मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे बऱ्याच हानीकारक समस्या उदारणार्थ स्थूलपणा व मधुमेह यापासून बचाव होण्यास मदत होते. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मीठ-पाण्यामुळे फक्त मधुमेहच नाही, तर अनेक जीवघेण्या आजारांपासून आपला बचाव होतो. काळ्या मिठाचे पाणी प्यावे. त्यामध्ये ८० पेक्षा जास्त खनिजे असतात.

त्वचा विकार : या पाण्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. त्वचेवरील पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग अशा समस्या दूर होतात.

वजन कमी करणे : कोमट पाण्यातून काळे मीठ प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे स्थूलपणा कमी होतो. कोलेस्टेरॉलदेखील कमी करण्यास मदत करते. मधुमेह होण्याची शक्यता कमी होते.

मंत्री महादेव जानकर संतप्त, भाजपवाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलं 

रासपचे अध्यक्ष दुग्ध व मत्स्य विकास राज्यमंत्री महादेव जानकर म्हणाले, मला भाजपवाल्यांनी टाकून दिलेलं खात दिलेलं आहे. अशी नाराजी व्यक्त करतं स्वत: च्याच सरकारविरूध्द टीका केली. आपला पक्ष छोटा असल्याने त्यांनी असं केलं असेही जानकर म्हणाले.

चिंचवडमध्ये आदर्श शिक्षक आणि शाळा पुरस्कार वितरण समारंभात रासपचे नेते महादेव जानकर बोलत होते.   दरम्यान, यावेळी पुढे बोलताना जानकर म्हणाले, जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण तुम्ही महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे तशं बघू नका. या शाळांवर लक्ष व्यवस्थित दिलं तर उद्याचा दिवस चांगला येईल, असंही जानकर यावेळी म्हणाले.

जागा वाटपावरून जानकर नाराज…
युतीचा मित्र पक्ष म्हणून महादेव जानकर आहेत. मित्रपक्षांना सन्नानपूर्वक जागा द्या अशी मागणी युतीच्या मित्रपक्षांनी केलेली आहे. मात्र अद्यापही जागांचा तिढा सुटला नसल्यामुळे मित्र पक्ष सध्यातरी नाराज असल्याचे विविध वक्तव्यानंतर दिसून येत आहेत.

मनसेचा खळखट्टयाक : दादर रेल्वेस्थानकावरील टॅक्सीवाल्यांना हद्दपार करणार

0

मुंबई : दादर रेल्वेस्थानकावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टॅक्सीमध्ये बसावे म्हणून टॅक्सी चालकाने हट्ट करत त्रास दिला होता. या प्रकारामुळे खासदार सुळे यांनी तक्रार केली होती. दरम्यान, मनसेने याची गंभीर दखल घेत टॅक्सी चालकांविरूध्द संताप व्यक्त केला. मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी ‘सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या, एकही टॅक्सीवाला किंवा दलाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही’, असं म्हंटल आहे.

दोन दिवसापूर्वी सुळे या दादर रेल्वे स्थानका दरम्यान ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. आपल्या टॅक्सीमध्ये बसावं म्हणून एका एजंटने त्यांचा रस्ता अडवत गैरवर्तन केले. सुळे यांनी ट्विटकरत रेल्वे मंत्रालयाकडे याची तक्रार केली होती. त्यानंतर टॅक्सी चालकाला पोलिसांना अटक केली होती.

दरम्यान, मनसेचे नेते नितीन नांदगावकर यांनी ‘सुप्रियाजी मला फक्त १५ दिवस द्या, एकही टॅक्सीवाला किंवा दलाल रेल्वे प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही’, असं म्हंटल आहे. नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांचा अवधी देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने टॅक्सी दलालांवर कारवाई न केल्यास आपल्या स्टाईलने प्रश्न सोडवण्याचा इशारा दिला आहे. कारवाई न झाल्यास खळखट्ट्याक होण्याची चिन्हे आहेत.

गृहिणी, नोकरदार स्त्रीने पाळावे व्यायामाचे हे नियम

0

महिलांना घर आणि बाहेरील कामांशिवाय मुलांची जबाबदारी देखील पार पाडावी लागते. स्पर्धेत त्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाहीत. त्यामुऴे फिटनेस टिकवून ठेवणे हे पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी अवघड असते. घर आणि बाहेरील कामांशिवाय मुलांची जबाबदारी देखील पार पाडावी लागते. अशावेळी पुढे जाण्याच्या स्पर्धेत त्या आपल्या फिटनेसकडे लक्ष देत नाहीत. काही आसनांचे नियम तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करतील.

सूज, थकवा कमी होईल

  1. खुर्चीवर बसावे. पायांना ३० सेकंद सरळ ठेवावे. असे थोड्या थोड्या वेळाने केल्यास पायांमध्ये सूज किंवा थकवा येत नाही. पायाच्या दुखण्यांना आराम मिळतो.
  2. खुर्चीवर बसून पायांना सरळ ठेवा. अंगठ्याला जमिनीवर टेकवून एकवेळा क्लॉकवाइज आणि नंतर अँटीक्लॉकवाइज फिरवा. यामुळे रक्तप्रवाह वाढतो.
  3. खुर्चीवर बसून तुमच्या डोक्याला डाव्या हाताने उजव्या बाजूला घेऊन जा. १५ ते २० सेकंद असेच ठेवल्यानंतर डोक्याला उजव्या हाताने डाव्या बाजूला न्या. याला ट्रेक टि‌्वस्ट असे म्हणतात.

लवचिकपणा वाढेल

  1. व्यायाम सुरू करण्यापूर्वी मांसपेशींना लवचिक करणे गरजेचे आहे. यामुळे स्ट्रेचिंगसारख्या व्यायामाने सुरुवात करावी. यामुळे लवचिकता वाढते.
  2. दररोज वॉकिंग करा. हे तुमचे खांदे,शरीराच्या खालचा भाग,मांड्या आिण पायांच्या स्नायूंना सक्रिय बनवण्यास मदत करते. यासाठी वॉकिंग करणे फायदेशीर आहे.
  3. तुमच्यासाठी जंपिंग जॅक एक चांगला व्यायाम आहे. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. वजन कमी करण्यासाठी हे दररोज करणे फायदेशीर आहे.

हॉरर थीमसोबत सुरु होईल ‘बिग बॉस’चे 13 वे सीजन

रियलिटी शो ‘बिग बॉस’ चे 13 वे सीजन लवकरच सुरु होणार आहे. शोमध्ये अनेक बदल केले गेले आहेत. कन्टेस्टंट काचेच्या भिंती असलेल्या घरात राहणार आहेत. सोबतच सीजनची थीम हॉरर ठेवली गेली आहे. कन्टेस्टंटला दोन ग्रुप्समध्ये विभागले केले जाईल. प्रत्येक ग्रुपमध्ये कमीत कमी 6 सदस्य असतील. या ग्रुप्सला घोस्ट्स आणि प्लेयरचे नाव दिले जाईल. दोन्हीचे टीम मेंबर्स एकमेकांना अनोळखी असतील.

प्लेयर टीमच्या सदस्यांना घोस्ट्स टीमटीमच्या सदस्यां ओळख पटवून देऊन एंट्रीचा रस्ता बनवावा लागेल. तर घोस्ट्स टीम स्वतःची ओळख कळू देण्यापासून वाचतील आणि प्लेयर्सला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतील.

पहिल्यांदा सलमान करणार एलिमिनेशन…

पहिल्यांदा पहिल्या आठवड्याचे एलिमिनेशन स्वतः होस्ट सलमान खान करणार आहे. तो हा निर्णय कन्टेस्टंट्च्या परफॉर्मन्सच्या आधारे घेणार आहे. सोबतच पुढच्या आठवड्याचे नॉमिनेशनदेखील त्याच्याच हातात असणार आहे.

दोन्ही ग्रुप्सचे सस्पेक्टड सदस्यांची नावे दिली आहेत. घोस्ट्स टीममध्ये मेघना मलिक, पवित्रा पूनिया आणि माहिका शर्मा यांच्यासह 6 सदस्य असतील. तर प्लेयर्सच्या टीममध्ये देवोलिना भट्टाचार्जी, रश्मि देसाई, दयानंद शेट्टी, राजपाल यादव, सिद्धार्थ शुक्ला हे दिसणार आहेत. कॅप्टनचे रम मागच्या सिजनपेक्षा मोठे असेल आणि त्याला अनेक स्पेशल पॉवर दिल्या जातील.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंचा शनिवारी भाजपप्रवेश ?

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा सुरु होती. अखेर उदयनराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज रात्री भोसले आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. उद्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. यामुळे राष्ट्रवादीला मोठा झटका बसणार आहे.

उदयनराजे भोसले कोणता निर्णय घेतात, याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले आहे. उदयनराजेंनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी गुरुवारी अचानक शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा झाली.

उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी १४ सप्टेंबर हा दिवस निश्चित झाला आहे. आज रात्री दिल्लीत जाऊन ते खासदारकीचा राजीनामा देणार आहेत.

शिवसेनेला 120 जागा देण्याची भाजपची तयारी

युतीमध्ये जागा वाटपावरून अद्यापही एकमत झालेलं नाही. शिवसेना फिफ्टी- फिफ्टीच्या फॉर्म्यूल्यावर अडून बसलेली आहे. मात्र, भाजपला हा फॉर्म्यूला मान्य नाही. परंतु भाजपा सेनेला फक्त 120 जागा देण्याच्या तयारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला 115 ते 120 जागा देण्याबाबत राज्यातील नेत्यांना सुचवलं आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेसोबत युती करायची असेल तर किमान 126 ते 128 जागा शिवसेनेला द्याव्या, अशी गळ भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला घातली आहे.

शिवसेनेला किमान 126-128 जागा दिल्या तरच शिवसेनेशी सन्मानपूर्वक युती होऊ शकेल आणि काही अडथळा येणार नाही असं राज्यातील भाजप नेत्यांचं मत असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेतृत्वाने देखील 125 ते 130 जागांमध्ये सन्मानपूर्वक तोडगा काढण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘मातोश्री’त खलबते झाल्याचंही बोललं जातं. 2 दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस ‘मातोश्री’वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुचविलेला जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला. त्यामुळे युतीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात गणेश विसर्जनाला गालबोट; १९ भक्तांना जलसमाधी

राज्यभरात गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला गुरुवारी जड अंत: करणाने निरोप दिला. यावेळी अनेक ठिकाणी गालबोट लागलं असून, अनेक भक्तांवर मृत्यू ओढवला. मुंबई, कोकणासह राज्यभरात १९ भाविकांना जलसमाधी मिळाली. यामुळे विसर्जनाला विघ्न लागले.

ठाणे – शहापूरात मुलाचा बुडून मृत्यू

कुंडनच्या नदी तोल जावून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्पेश प्रकाश जाधव ( वय १२ ) असं मुलाचं नाव असून तो कुंडन गावातील कातकरी वाडी राहाणारा आहे.

रत्नागिरी – राजापूरात तीन तरूण बुडाले

गणपती विसर्जनासाठी गेलेले तीन तरूण बुडाल्याची दुर्देवी घटना राजापूरात दोन ठिकाणी घडली आहे. गुरूवारी सायंकाळी पावणे सात वाजता धोपेश्वर येथे सिध्देश प्रकाश तेरवणकर (वय २०) हा तरुण बुडाला. तर पडवे येथे गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन तरूण बुडाले. कुलदीप रमाकांत वारंग (वय २०) आणि ऋतिक दिलीप भोसले (वय २६) असे बुडालेल्यांची नावे आहेत.

तारकर्ली – आचरा समुद्रात दोन तरूण बुडाले

येथील आचरा समुद्रामध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी आचरा येथे समुद्रात गेलेले प्रशांत तावडे आणि संजय परब गणपती विसर्जन करून माघारी परतत असताना लाटेच्या तडाख्यात पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले.

नगरमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

नगरमध्ये विसर्जनासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर येथील प्रवरा नदीत आणि शेवगावमधील ढोरा नदीत बुडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

नागपुरात दोघांचा मृत्यू

गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूरात घडली आहे. ही घटना शहाराजवळ असलेल्या हिंगणा परिसरातील संगम व खरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदीत घडली. सुरेश शिवराम फिरके (वय ४८) आणि त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (वय १८) अशी मृतांची नावे आहेत.

अमरावती – पूर्णा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू

अमरावतीत विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या एका तरुणाला बुडताना वाचवायला गेलेल्या इतर तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेमुळे अमरावतीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सतीश जाबराव सोळंके, ऋषीकेश बाबुराव वानखेडे, सतीश बारीकराव वानखेडे आणि सागर अरुण शेंदूरकर अशी नदीत बुडालेल्या चौघांची नावं आहेत.

वाशिम – घरगुती गणेश विसर्जनादरम्यान एकाचा मृत्यू

घरगुती गणेश विसर्जनादरम्यान वाशिममधील मंगरूलपीर तालुक्यात मसोला खुर्द येथे १७ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे.

नांदेडमध्येही एकाचा मृत्यू

हदगाव तालुक्यातील तामसा गावातलील एका तरूणाचा गणेश विसर्जनाच्या वेळी मृत्यू झाला. शशिकांत कोडगीरवार (वय २१) असं त्या युवकाचं नाव आहे.

वर्धा – विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू

गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू झालाय. जुनापाणी येथे शेतातील विहिरीत विसर्जन करीत असताना तरुण बुडाला. गुणवंत गाखरे असं मृतकाचं नाव.

कराडमध्ये एकाचा मृत्यू

आगाशिव नगर येथील चेतन शिंदे हा गणेश भक्त कोयना नदीमध्ये वाहून गेला आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहामुळे मुलगा सापडला नाही.

भंडाऱ्यात एकाचा मृत्यू

लाखांदूर तालुक्यातील ढोलसर गावात राहणारा लोकेश देवराम शिवणकर गणपती विसर्जना दरम्यान मासळ शेतशिवारातील नाल्यात वाहून गेले आहेत. त्यांचे वय ४० वर्षे आहे. उपस्थित नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला यश आलं नाही.

राज्यात नव्या मोटार वाहन कायद्याला तुर्तास स्थगिती – परिवहन मंत्री, दिवाकर रावते

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना भरमसाठ दंडाची तरतूद या नव्या कायद्यात असल्याने त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे.

नव्या मोटार कायद्याला राज्यात तुर्तास स्थगिती देण्यात आल्याचे आज (बुधवार) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना भरमसाठ दंडाची तरतूद या नव्या कायद्यात असल्याने त्याला सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. तसेच पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर रावते यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.
रावते म्हणाले, “नव्या कायद्यानुसार वाढीव दंडाचा फेरविचार करण्याची विनंती केंद्र सरकारकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत केंद्रीय मंत्र्यांचे या पत्राला उत्तर येत नाही तोपर्यंत या कायद्याचा अध्यादेश राज्यात लागू होणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या जुन्या कायद्याप्रमाणेच दंडवसूली केली जाईल.
दरम्यान, या नव्या कायद्याचे समर्थन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, नव्या कायद्यातील दंडाची तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी करण्यात आलेली नाही तर वाहतुकीचे नियम न पाळल्याने होणाऱ्या रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी करण्यासाठी आहे.

मोदी सरकारचा पाच वर्षात  जाहिरातींवर ५,७०० कोटी रुपयांचा चुराडा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मे २०१४ ते मार्च २०१९ या काळात जाहिरातींवर एकूण ५ हजार ७०० कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. या काळात इंग्रजी वृत्तपत्रांच्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांवर मोठय़ा प्रमाणात पैसा खर्च केल्याचे दिसून येते. माहिती अधिकारातून याबाबतची आकडेवारी उघड झाली आहे.

हिंदी भाषिक राज्यांमध्ये पाळेमुळे अधिक घट्ट व्हावीत यासाठी मोदी सरकार पुरेपूर प्रयत्नशील असल्याचे या आकडय़ांवरून स्पष्ट होते. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सरकारी जाहिरातींसाठी मोदी सरकारने ७१९ कोटी रुपयांहून अधिक पैसे खर्च केलेत, तर हिंदी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींसाठी ८९० कोटींहून अधिक पैसे मोजल्याचे समोर आले आहे.

पाच वर्षाच्या काळात हिंदी वृत्तपत्रांमध्ये सर्वाधिक १०० कोटी रुपयांहून अधिकच्या जाहिराती ‘दैनिक जागरण’ला मिळाल्या. त्या पाठोपाठ ‘दैनिक भास्कर’ला ५६ कोटी ६२ लाख रुपयांच्या, तर ‘हिंदुस्तान’ आणि ‘पंजाब केसरी’ला ५० कोटी ६६ लाख रुपयांच्या सरकारी जाहिराती मिळाल्या. ‘अमर उजाला’ने सरकारी जाहिरातींतून ४७.४ कोटी रुपयांची कमाई केली. ‘नवभारत टाइम्स’ला ३ कोटी ७६ लाख रुपये आणि ‘राजस्थान पत्रिका’ला २७ कोटी ७८ लाख रुपयांच्या सरकारी जाहिराती मिळाल्या.

इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सरकारकडून सर्वाधिक २१७ कोटी रुपयांहून अधिकच्या जाहिराती मिळवण्यामध्ये ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने बाजी मारली. ‘द हिंदुस्तान टाइम्स’ने १५७ कोटी रुपयांहून अधिकच्या जाहिराती मिळवून दुसरे स्थान पटकावले. तिस-या क्रमांकावरील ‘डेक्कन क्रॉनिकल’ला ४० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या सरकारी जाहिराती मिळाल्या. ‘द हिंदू’ला (द हिंदू बिजनेस लाइनसह) पाच वर्षांच्या काळात ३३.६ कोटी रुपयांहून अधिक जाहिराती मिळाल्या, तर ‘द टेलीग्राफ’ला २०.८ कोटी रुपयांहून अधिक सरकारी जाहिराती मिळवण्यात यश आले. ‘द ट्रिब्यून’ला १३ कोटी रुपयांच्या जाहिराती, तर ‘डेक्कन हेराल्ड’ला १०.२ कोटी रुपयांहून अधिक सरकारी जाहिराती मिळाल्या.

‘द इकॉनॉमिक टाइम्स’ला ८.६ कोटी रुपयांहून अधिक जाहिराती मिळाल्या, तर ‘द इंडियन एक्सप्रेस’ला केवळ २६ लाख रुपयांहून अधिक आणि ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ला २७ लाख रुपयांहून अधिक सरकारी जाहिराती मिळाल्या.

इंटरनेटच्या जाहिरातींवर चौपट खर्च

इंटरनेट जाहिरातींवर सरकारी खर्चामध्ये जवळपास चौपट वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान इंटरनेट जाहिरातींवरील खर्च ६.६४ कोटी रुपयांहून वाढून २६.९५ कोटी रुपये झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.