मुंबई: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात ६ अटकेत

- Advertisement -

 

मुंबईतील लोअर परळ येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी शुक्रवारी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी, ३ अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून इतर ३ आरोपींची रवानगी ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, एक आरोपी हा पीडित मुलीचा मित्र आहे. पीडितेने पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबानंतर आरोपीना अटक करण्यात आली.

- Advertisement -