Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईआजच्या घडामोडी

आजच्या घडामोडी

#NewsAlerts
1). नाशिक : भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश
-नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी, बिबट्याच्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी

2). भंडारा, गोंदियासह नागपूर जिल्ह्यात जोरदार गारपीट

3). वैतरणा रेल्वे स्थानकात 7 वर्षीय मुलाच्या बॅगेत साडेसहा लाखांची रोकड

4). दुष्काळाशी लढण्याची तयारी, चारा छावण्या सुरू करणार, शेतकऱ्यांना 2 हजार 900 कोटी वितरित

5). – शिवसैनिकांचा नवी मुंबईतील वाशीच्या आयनॉक्समध्ये गोंधळ
– ठाकरे सिनेमाचे पोस्टर न लावल्याबद्दल विचारला जाब
– पोस्टर न लावल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा

6). उत्तर भारतीयांना धमकवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
-उत्तर भारतीयांना धमकावण्याचा काही जण प्रयत्न करत होते. परंतू गेल्या चार वर्षांत कुणाची या लोकांना धमकावण्याची हिंमत झालेली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

7). श्रीहरिकोटा: ‘पीएसएलव्ही सी ४४’ उपग्रहाचे सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण

8).,मुंबईतील वडाळा येथील कार्निव्हल सिनेमॅक्सबाहेर ‘ठाकरे’ चित्रपटाचा १६ फुटी कटआऊट.
‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होत असून, मुंबईतील वडाळ्याच्या कार्निव्हल सिनेमॅक्समध्ये आकर्षक सजावट केली असून, शिव वडापावचा स्टॉलही लावला आहे.
– ‘ठाकरे’ चित्रपटाचा पहाटे ४.१५ वाजताचा पहिला शो पाहण्यासाठी मुंबईतील वडाळा कार्निव्हल सिनेमॅक्सला गर्दी, ढोलताशांच्या गजरात प्रेक्षकांचं स्वागत.

9). कुठल्याही दिवशी युतीची घोषणा: चंद्रकांत पाटील

10).,मुंबई: मध्य रेल्वेवर शनिवारी, रविवारी ब्लॉक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments