Friday, March 29, 2024
Homeकोंकणठाणेडीजी ठाणे स्मार्ट  मुले प्रश्नमंजुषा स्पर्धा स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

डीजी ठाणे स्मार्ट  मुले प्रश्नमंजुषा स्पर्धा स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद २५ जानेवारीला होणार अंतिम फेरी

 

ठाणे(23): विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी, त्यांना स्मार्ट बनवण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या डीजी ठाणे या डिजिटल प्रणालीद्वारे ठाणे महापालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डिजीठाणे स्मार्ट मुले प्रश्नमंजुषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीचे उदघाटन ठाणे महापालिकेचे उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

    ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड व शहरातील विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद साधण्याच्या उद्देशाने शालेय  विद्यार्थ्यांसाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून व स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे यांच्या मार्दर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली आहे.

   आज झालेल्या या उपांत्य पूर्वफेरीतून पहिल्या 6 वी ते 8 वी गटात गौतम इंग्लिश स्कूल, एसएमजी विद्यामंदिर(इंग्रजी माध्यम), न्यू हॉरीझॉन स्कूल, व डीएव्ही पब्लिक स्कूल तर 9 वी ते 10 वी  या मोठ्या गटात सेंट जॉन बाप्तिष्ट हायस्कूल(इंग्रजी माध्यम), आर.एस.देवकर इंग्लिश मिडीयम स्कूल, ठामपा माध्यमिक शाळा क्र.४ व ज्ञानगंगा स्कूल(मराठी माध्यम) या शाळेची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

      डिजीठाणे स्मार्ट किड प्रश्नमंजुषा स्पर्धा ठाण्यातील 10 ते 16 वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास उद्दीष्टाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि ठाण्यातील  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेत ठाण्यातील सुमारे ४८ शाळांतील विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. प्रत्येक शाळेतील 6 वी ते 8 वी व 9 वी ते 10 वी या गटासाठी प्रत्येकी दोन विद्यार्थी निवडले होते. असून प्राथमिक फेरीनंतर या विद्यार्थ्यांची उपांत्यपूर्व फेरी आज महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात पार पडली.

     सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी यांविषयी प्रश्न या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विचारण्यात आले होते. उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्या स्पर्धकांची  अंतिम फेरी शुक्रवार दिनांक 25 जानेवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत  विजयी ठरणारे विद्यार्थी, ठाण्यातील ‘डिजीटल स्मार्ट किड’ ठरणार असून विद्यार्थ्यांसह  त्यांच्या शाळांसाठीही खास पुरस्कार दिले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments