Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeट्रेंडिंगतर मंत्र्यांना दावणीला बांधा -छगन भुजबळ

तर मंत्र्यांना दावणीला बांधा -छगन भुजबळ

शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार-जयंत पाटील

भाजपने सर्वसामान्य लोकांचं जीणं मुश्किल केले आहे -धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा तिसरा टप्पा…

*जालना – घनसावंगी – दि.२३ जानेवारी-*
दुष्काळी भागातील जनावरांच्या छारा छावण्यांना द्यायला पैसै सरकारकडे नाहीत.जनावरं मेल्यावर पैसे देणार का? असा सवाल करतानाच या सरकारकडे पैसै नसतील आणि जर सरकारचे मंत्री देतो सांगण्यासाठी येत असतील तर त्या मंत्र्यांना दावणीला बांधा असा संताप सरकारला वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या बाजुने बोलताना माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी घनसावंगी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी चारा व छावण्या मागितल्या आणि यांनी डान्सबार आणि लावण्या दिल्या … गायीला वाचवा आणि बाईला नाचवा असे हे भाजप सरकार असल्याची जोरदार टिकाही आमदार छगन भुजबळ यांनी केली.

दिल्लीत आणि राज्यातील सरकार संविधान विरोधी आहे. हे सरकार काय खायचं काही नाही हे सांगून वातावरण बिघडवत आहे. हे काय चाललंय या राज्यात… सरकार संवेदनाहीन झाले आहे असा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला.

आमदार छगन भुजबळ हे भाजप सरकारवर चांगलेच बरसले.

घटनेने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मी बोलणार…माझं बोलणं कुणीही थांबवू शकणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमदार छगन भुजबळ यांनी मांडली.

ज्याने खेळण्यातील विमान कधी बनवलं नाही त्याला राफेल विमान बनवण्याचा काम देण्यात आले. काय चाललं आहे या देशात अशा सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

मोदी ज्या वयात चहा विकत होते त्याचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्याठिकाणी रेल्वे स्टेशनच नव्हते मग यांनी चहा विकली कुठे अशी खिल्ली आमदार छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदी यांच्या चहा विकण्याची उडवली.

पाच फुटाची म्हैस बाळंत झाली तर तिला १५ फुटाचे रेडकू कसे होईल अशी स्पष्टता महाराष्ट्र सदन बांधकामाबाबत आमदार छगन भुजबळ यांनी केली.

योगी नरेंद्रचा एकच नारा..ना घर बसा है हमारा ना बसने देंगे तुम्हारा असा जबरदस्त टोलाही आमदार छगन भुजबळ यांनी लगावला.

चुनावी जुमला चालू आहे. ओबीसी मुलांची शिष्यवृत्ती भरली गेली नाहीच शिवाय विकासाचा मुद्दा यांच्याकडे नाही त्यामुळे जातीजातीमध्ये भांडणे लावण्याचे कामे होतील. त्यामुळे सावध रहा असे आवाहनही आमदार छगन भुजबळ यांनी केले.

गरीबांचे अश्रू पुसु शकत नाही… महिलांना न्याय देवू शकत नाही.. नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी सुरू आहे. तुमच्या भावनांशी खेळ सुरू आहे. त्यामुळे परिवर्तन झाले पाहिजे असेही आमदार छगन भुजबळ म्हणाले.

*शेतकर्‍यांना कर्जमाफी देणारा एकमेव नेता म्हणजे शरद पवार – जयंतराव पाटील*

या देशात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार आहेत परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटी कवडीही दिली नाही असा आरोप प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी घनसावंगी येथील जाहीर सभेत केला.

पाच वर्ष झाली काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवलं आहे अशी मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता यासरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले.

भाजपने साडेचार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण केली की नाही याची विचारणा जमलेल्या तमाम जनतेला प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. त्यावेळी तमाम जनतेमधून एकच उत्तर *’नाही’* असे आले. यातून सरकारबद्दल किती संताप आहे यातून दिसले.

या देशात काय चालले आहे. लोकशाहीची थट्टा केली जात असून यावर विचार करायला हवा असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या पापात शिवसेनेचा ५० टक्के वाटा आहे. निव्वळ विरोध करण्याचे काम करत आहेत. जर विरोध करत आहात तर सत्तेची उब का सोडवत नाही असा सवालही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

भाजप सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरली आहे. नोकर्‍या देण्यात अयशस्वी आणि आश्वासनांचे गाजरं दाखवण्यात यशस्वी झाले आहेत.

या राज्यात सरकारकडून अघोषित आणीबाणी लागू करण्यात आली आहे असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी ५७ मोर्चे निघाले होते. जसे १० टक्के आरक्षण दिले तसे मराठा आरक्षणाबाबत सरकारने का निर्णय घेतला नाही असा सवालही आमदार जयंतराव पाटील यांनी केला.

या देशातील जनतेला का फसवताय हा माझा सवाल नरेंद्र मोदी यांना आहे.

राष्ट्रवादी ही नवीन चेहर्‍यांना संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकांमध्ये नवीन चेहर्‍यांना, तरुणांना संधी दिली जाणार असून निवडणूकीत यश मिळवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर अनेक सवाल निर्माण होत असून त्यांच्या झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करा अशी मागणी आमदार जयंतराव पाटील यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील हे परिवर्तन संपर्क यात्रेमध्ये भाजप सरकार आणि मोदी यांच्याविषयी व्हिडिओ क्लीप दाखवत असून हा खोट्या आश्वासनाचा मुद्दा जनतेच्या गळी चांगलाच उतरत असून या संकल्पनेला जनतेमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

*भाजपने सर्वसामान्य लोकांचं जीणं मुश्किल केले आहे – धनंजय मुंडे*

या सरकारच्या काळात महागाईची झळ इतकी सोसावी लागत आहे की, सर्वसामान्य लोकांचं जीणं मुश्किल केले आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

१५ लाख रुपये आपल्या खात्यात येतील याची सुतराम शक्यता नाही. एखादा भक्त आला तर त्याला सांगा आधी २-४ लाख रुपये उसने द्या मोदींनी खात्यात १५ लाख जमा झाल्यावर देतो असे सांगा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

आसूड घेवून सेनेवाले म्हणत होते देता की जाता परंतु आज शिवसेनेला देता पण येईना आणि जाताही येईना अशी अवस्था झाल्याची जोरदार टीकाही धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर केली.

भाजपने सत्तेत असताना जे पाप केले आहे त्याच पापामध्ये शिवसेना सहभागी असल्याचा आरोप ही धनंजय मुंडे यांनी केला.

पाच मंत्र्यांच्या तुकड्यासाठी स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज लाचार झाली आहे असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.

लूट होवू देणार नाही सांगणार्‍याने तुमची दीड लाख रुपयांची लूट केली असेल तर अशा लूट करणाऱ्यांना पुन्हा लूट करायला देणार की परिवर्तन करणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत जनतेला केला.

सदनात आणि सदनाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शेतकरी संपावर गेले त्यामुळे सरकारने कर्जमाफी जाहीर केली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाहीर केलेल्या या कर्जमाफी अद्याप मिळालेली नाही.

जालन्याचे नेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमच्या शेतकर्‍याला साल्या म्हणत आहेत… तू ये निवडणूकीत नाही तुझ्या बुडावर मारली तर नाव सांगणार नाही असे जबरदस्त आव्हान देताना त्या नेत्याचा खरपूस समाचारही धनंजय मुंडे यांनी घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात बुलढाणा जिल्हयातून झाली. त्यानंतर औरंगाबाद जिल्हयातून आता जालना जिल्हयात परिवर्तन संपर्क यात्रा घनसावंगी येथे दाखल झाली असून पहिली सभा प्रचंड गर्दीमध्ये पार पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर सभेला माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान,जालना जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदी नेत्यांसह घनसावंगी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments