Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रसन २०१८-१९ चा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाटय़ स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्‍न

सन २०१८-१९ चा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाटय़ स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्‍न

बृहन्‍मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणांना व त्‍यांच्‍यातील
सर्जनशिलतेला वाव देणारी व सामाजिक जनजागृती करणारी स्‍पर्धा म्‍हणून सन २०१८-१९ चा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाटय़ स्‍पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिक्षण समितीचे
अध्‍यक्ष श्री. मंगेश सातमकर यांच्या शुभहस्‍ते व अध्‍यक्षतेखाली आज मंगळवार, दिनांक २२ जानेवारी,
२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता मास्‍टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, कै. नटवर्य दत्ता भट मार्ग,
विलेपार्ले (पूर्व) येथे संपन्‍न झाला.
या समारंभास पाहुणे म्‍हणून ‘नकळत सारे घडले’ या दुरदर्शन मालिकेतील नट श्री. हरीश दुधाडे, सह
दिग्‍दर्शक श्री. मनिष रेवडेकर, परीक्षक प्रतिनिधी म्‍हणून प्रसिध्‍द लेखक, दिग्‍दर्शक श्री. बबन गटकळ, स्‍थानिक
नगरसेविका श्रीमती सुधा सिंग, शिक्षण समिती सदस्‍य सर्व श्री. सुरेंद्रकुमार सिंग व साईनाथ दर्गे, सहआयुक्‍त
(शिक्षण) श्री. मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर हे उपस्थित होते.
सदर प्रसंगी सहआयुक्‍त (शिक्षण) श्री. मिलिंद सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले, तर अध्‍यक्ष,
शिक्षण समिती श्री. मंगेश सातमकर यांनी आपल्‍या भाषणात महापालिकेतील विद्यार्थ्‍यांना अभिनय क्षेत्रात वाव
मिळावा, त्‍यांच्‍यातील कलागुणांचे कौतुक व्‍हावे व शिवसेना युवानेते श्री. आदित्‍य ठाकरे व पर्यावरण मंत्री श्री.
रामदास कदम यांच्‍या संकल्‍पनेतून समाजाला भेडवसावणाऱया प्‍लास्‍टीक बंदी, वृक्षारोपण याविषयावर आधारित
गेल्‍या दोन वर्षापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पथनाटय़ स्‍पर्धेचे आयोजन महापालिकेतर्फे केले
जाते.
या स्‍पर्धेनुसार “वसुंधरा की एक ही पुकार”, “वृक्ष लगाकर करो सहकार” या विषयाच्‍या पथनाटयकरीता
प्रबोधनकार ठाकरे नगर, उ.प्रा.मराठी शाळा (एफ /दक्षिण विभाग ), या शाळेस प्रथम क्रमांकांचे रु. १०,०००/- रोख
रक्‍कम ,तर “प्‍लास्टिक बंदी काळाची गरज” या विषयाकरीता अशोक वन महानगरपालिका (आर/दक्षिण विभाग )
या शाळेस ७,०००/- रोख रक्‍कम व्दितीय क्रमांक मिळाला तर “स्‍वच्‍छतेचा दिवा घरोघरी लावा” या
विषयाच्‍या पथनाटयकरीता सोडावाला लेंन महानगरपालिका इंग्रजी शाळा (आर/मध्‍य विभाग) या शाळेस रु.
५,०००/- च्‍या तृतीय क्रमांक मिळाला. त्‍यामध्‍ये रोख तिन्‍ही शाळाना सन्‍मानचिन्‍ह व सहभाग घेणाऱया
विद्यार्थांस प्रमाणपत्र देण्‍यात आले. यावेळेस उत्‍कृष्‍ट लेखन व दिग्‍दर्शन करणाऱया शिक्षकांचा रुपये २,०००/- रोख
देऊन गौरव करण्‍यात आला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते. शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर यांनी
उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments