आंध्र प्रदेश: चंद्राबाबू नायडू यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हाणामारीत टीडीपीचे ७ कार्यकर्ते ठार

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -
Andhra Pradesh Chandrababu Naidu Telugu Desam Party
Image: ANI

आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील कंदुकुरू येथे बुधवारी तेलुगू देसम पक्षाचे नेते एन चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत सात तेलुगू देसम पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

“७ जणांना जीव गमवावा लागला आहे, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर नायडू यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

- Advertisement -

नायडू म्हणाले की, या घटनेतील मृतांच्या मुलांना एनटीआर ट्रस्टच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण दिले जाईल.

 

Web Title: Andhra Pradesh: Chandrababu Naidu Yanchya Rallydarmyan Zalelya Hanamarit TDP Che Saat Karyakarte Thar

- Advertisement -