Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडावडार समाजाचा भाजपाचे उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे यांना जाहिर पाठिबा

वडार समाजाचा भाजपाचे उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे यांना जाहिर पाठिबा

लातूर :लोकसभा निवडणूकी साठी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना लातूर जिल्हा वडार माझ्या संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला भाजपा हाच आज देश चालविण्यास सक्षम पक्ष असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सुधाकर शृंगारे यांना विजयी करण्याचा निर्धार संघटनेच्या व वडार बांधवाच्या वतीने करण्यात आला.

वडार माझा संघटनेच्या वतीने सुधाकर शृंगारे यांचा सत्कार करून पाठिंब्याचे पत्र देण्यात आले .लातूर जिल्ह्यात वडार समाजाची लोकसंख्खा ही मोठ्या प्रमाणात आहे उमेदवाराना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे देशाला विकासाच्या दिशेला नेणारी आहेत . देशाला आज मोदी यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे . देशाचा विकास करायचा असेल तर मोदी आणि भाजपा सरकारची गरज आहे .

भाजपा सरकारने सामान्य जनतेच्या हिताची धोरणे राबवली आहेत या सरकारला पुन्हा संधी मिळावी यासाठी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला असल्याचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष श्री शाम चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी सांगितले . यावेळी पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेब,महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकर श्रृंगारे, व युवा नेते श्री अरविंद भैया पाटील निंलगेकर व वडार माझा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री शाम चव्हाण, परमेश्वर बिजापुरे ,रावसाहेब आपटे,अादिसह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments