Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडानागरिकांची तपश्चर्या वाया जाऊ देणार नाही, व्याजासह विकासाच्या स्वरूपात परत करू -...

नागरिकांची तपश्चर्या वाया जाऊ देणार नाही, व्याजासह विकासाच्या स्वरूपात परत करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी

छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापन देशासाठी आदर्शवत
जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार

औसा : तळपत्या उन्हातही लोकांची गर्दी पाहून पंतप्रधान मोदी यांनी इतक्या उन्हातही आलेल्या नागरिकांची तपश्चर्या वाया जाऊ देणार नाही, ते सर्व व्याजासह विकासाच्या स्वरूपात परत करू असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजप आणि शिवसेना महायुतीची विराट जाहीर सभा झाली. भाजप-शिवसेना युतीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँगेसवर निशाणा साधला. तसेच पाकिस्तानला लक्ष्य करत दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे हा आमचा संकल्प असून, ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लातूर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उध्दव ठाकरे, रामदास आठवले उपस्थित होते.
यावेळी मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच काँग्रेसवर निषाणा साधत काँग्रेसने देशाची फसवणुकच केली आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे ढकोसला पत्र आहे. त्यांच्या ढकोसला पत्रात फक्त काँग्रेसच्या स्व: तच्या फायद्याचा विचार आहे, तर आमच्या संकल्पपत्रात जनतेच्या कल्याणाची तरतूद आहे, त्यांचे ढकोसला पत्र हे फक्त २३ मे पर्यंत आहे तर आमचे संकल्पपत्र हे पुढील पाच वर्षांसाठी आहे. अशी टीका केली. यावेळी शरद पवार यांच्यावर टीका करताना मोदी यांनी काश्मीरला भारतापासून तोडाणार्यांच्या पाठीशी शरद पवार गेले आहेत अशी टीका केली.

जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार लातूरच्या पाण्याच्या प्रश्नाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी लातूरच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आंम्ही स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापण करणार असून, या मंत्रालयाव्दारे नदी जोड प्रकल्प, प्रत्येक गावात प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचा आमचा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापन देशासाठी आदर्शवत छत्रपती शिवरायांच्या पाणी व्यवस्थापनाविषयी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शिवरायांना बरेच जण फक्त एक महान योध्दा म्हणून ओळखतात. मात्र ते महान योध्द्या बरोबरचं, एक कुशल प्रशासक आणि त्या काळात पाणी व्यवस्थापनेचे त्यांचे कार्य पाहता ते महाराष्ट्रासोबतच देशासाठीही आदर्शवत आहे असे म्हटले.
भविष्यात जगात पाण्यासाठी युध्दे होतील असे म्हणत आंम्ही यासाठी देशाची पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत असे सांगितले. तसेच तुमच्या चौकीदाची कमाई ही तुमचा माझ्यावरचा विश्वास हीच आहे आणि या विश्वासावरच मी कार्यरत असल्याचे मोदी यांनी म्हटले.

यावेळी व्यासपीठावरती महाराष्ट्राचे मूख्खंमञी श्री देवेद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष श्री उध्दव ठाकरे,नामदार श्री संभाजीराव पाटील निंलगेकर साहेब, व अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments