Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडाकाँग्रेस उमेदवाराने गुपचूप अर्ज भरला, शक्तीप्रदर्शनात भाजप व महायुतीची बाजी

काँग्रेस उमेदवाराने गुपचूप अर्ज भरला, शक्तीप्रदर्शनात भाजप व महायुतीची बाजी

लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी गुपचूप अर्ज भरला. भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करुन आपला उमदेवारी अर्ज भरला. शक्ती प्रदर्शनात तर भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी बाजी मारली असून निवडणूकीतही तेच बाजी मारणार असे चित्र निर्माण झालेले आहे.

कोणतीही निवडणूक असो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केली जाणारे शक्ती प्रदर्शन महत्वाचे ठरत असते. लातूर लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी शक्तीप्रदर्शन करुन आपला अर्ज सादर केला. कालही त्यांनी अर्ज भरलेला होता मात्र आज प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करुन अर्ज भरला. यावेळी भाजपा, शिवसेना, रिपाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाऊन हॉल पासून शिवाजी चौकापर्यंत पायी रॅली काढण्यात आलेली होती.

या उलट काँग्रेसच्या उमेदवारावर गुपचूप जाऊन उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. लातूरातील गांधी चौकाजवळ काँग्रेसभवन आहे. मात्र तिथे शांतता होती. काँग्रेसच्या नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आला. फोटो पुरतीच उपस्थिती लावलेल्या काँग्रेसच्या नेत्यांमुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मच्छिंद्र कामत कोमात तर जाणार नाहीत ना, त्यांना बळीचा बकरा बनवला जाईल असेच म्हटले जात आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कांही दिवसांपूर्वीच त्यांचा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. हा प्रवेश लातूरातील देशमुखांना विचारून झाला नाही तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत प्रवेश दिला आणि तेंव्हाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले, असे सांगीतले जात आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शक्तीप्रदर्शनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामत नापास ठरले तर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुधाकर शृंगारेंनी मात्र बाजी मारली असेच दिसून येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments