Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडावंचित शेतकर्‍यांना पीकविमा मिळवून देणारच - पालकमंत्री निलगेंकर

वंचित शेतकर्‍यांना पीकविमा मिळवून देणारच – पालकमंत्री निलगेंकर

लातूर जिल्ह्यातील सर्वचमहसूल मंडळे दुष्काळग्रस्त जाहीर झाली असूनअडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना पीकविम्याच्या माध्यमातून आत्तापर्यंत 200 कोटी रुपयेमिळाले. काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यातील 11 महसूल मंडळे मागे राहिली आहेत. सर्वनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पिक विमा देण्याचीपालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी राहील, अशीग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीरावपाटील निलंगेकर यांनी रेणापूर येथील जाहीर सभेतबोलताना दिली.
लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचेउमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी रेणापूरयेथे आयोजित सभेत पालकमंत्री निलंगेकर बोलतहोते. यावेळी रमेशअप्पा कराड, उमेदवार सुधाकरशृंगारे, भाजपाचे विधानसभा प्रमुख अनिल भिसे, रेणापुर तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, लातूरतालुकाध्यक्ष विजय काळे, भाजयुमो जिल्हाध्यक्षअमित रेड्डी, रासपचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू गोरेरेणापूरचे नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांचीउपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानविरोधक आणि विशेषतः काँग्रेसकडून खालच्यापातळीवरील राजकारण केले जात आहे. यापक्षाचे नेते स्वतः बोलत नाहीत तर इतरांना समोरउभे करून बोलायला लावतात. मर्द असाल तरस्वतः बोला, मर्दासारखे राजकारण करा, हिम्मतअसेल तर समोरासमोर येऊन चर्चा करा, असे थेटआव्हान देऊन पालकमंत्री संभाजीराव पाटीलनिलंगेकर म्हणाले की, नळावरच्या भांडणाप्रमाणेकाँग्रेसकडून प्रचार केला जात आहे. परंतु आम्हीमात्र विकासावर बोलत आहोत. काँग्रेसकडेनैतिकता शिल्लक राहिलेली नाही. म्हणूनच यानेत्यांना खालच्या पातळीवर जाऊन टीका करावीलागत आहे.

स्वतःचे नाव बदलणारे जनतेला कायसांभाळणार महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे हेजमिनीशी नाळ जोडलेले, गरिबीची जाणीवअसलेले आहेत. याउलट काँग्रेसच्याउमेदवाराने व्यवसायासाठी स्वतःचे नावबदलले. जो व्यक्ती व्यवसायासाठी नावबदलतो, ज्या घरात जन्मलो ज्या समाजातवाढलो त्यांचा तो होऊ शकला नाही तुमचाआमचा काय होणार अशा व्यक्तीला मतदानकरणार का? असा प्रश्न संभाजीराव पाटीलयांनी सभेत बोलताना केले. कारखान्याचे मालक शेतकरी सभासदअसतानाही आम्हाला मतदान करा अन्यथा तुमचाऊस नेणार नाही, अशी भाषा वापरून शेतकर्‍यांनाकोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पणघाबरू नका, देशात आणि राज्यातही पुन्हाभाजपाचेच सरकार येणार आहे. त्यामुळे एकाहीशेतकर्‍याचा ऊस शिल्लक राहणार नाही, असेहीपालकमंत्री निलंगेकर यांनी बोलून दाखविले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथीलसभेत पाण्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्याचीघोषणा केली आहे. या माध्यमातून नदी जोडण्याचेप्रकल्प राबवले जाणार आहेत. मराठवाडा वॉटरग्रीडचा शुभारंभ लातूर जिल्ह्यातूनच होणारअसल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. आम्हीसरळ वागणारी मंडळी आहोत. त्यामुळेचविकासावर बोलतो.
ही निवडणूक देशहिताची आहे. स्थानिक प्रश्नांनायेथे स्थान नसते. त्यामुळे देशाच्या हितासाठीमहायुतीला मत द्या. काँग्रेसने आपल्याजाहीरनाम्यातून खरे रूप दाखवून दिले आहे. हाजाहीरनामा काँग्रेसचा की  पाकिस्तानचा असा प्रश्नपडत आहे .काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात देश प्रेमअसेल तर त्यांच्याही हातून कमळाचे बटन दाबलेजाईल. लातूर जिल्ह्यातील बेरोजगारी दूरकरण्यासाठी रेल्वे बोगी प्रकल्प सुरू होत आहे.येणार्‍या 25 डिसेंबर रोजी या प्रकल्पातून पहिलीबोगी बाहेर पडणार असल्याची माहितीहीपालकमंत्री निलंगेकर यांनी यावेळी दिली.
उमेदवार सुधाकर शृंगारे यावेळी बोलतानाम्हणाले की  मी गरिबीतून आलो आहे. त्यामुळेनिवडून आल्यानंतर सत्तेची मस्ती येऊ देणार नाही.आपला सेवक आणि जिल्ह्याचा चौकीदार म्हणूनकाम करेन. आपल्या सर्वांच्या सेवेची संधीकरण्यासाठी मला आशीर्वाद द्या, आपण दिलेलेप्रत्येक मत हे मोदींना मिळणार आहे, असे त्यांनीसांगितले.
प्रारंभी अनिल भिसे, मोहन माने, अभिषेकआकनगिरे, दशरथ सरवदे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनीकेले. या सभेत रेणापूर येथील रफिक शिकलकर,चंद्रकांत डावळे आणि त्यांच्या मित्र परिवारानेतसेच सेलू ग्रामपंचायतीचे सदस्य आबासाहेब चिंते, माजी सरपंच मनोहर सुरवसे, तंटामुक्तीचे अध्यक्षवामन सुरवसे यांच्यासह अनेकांनी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments