भारतीय लोकशाही – शोध आणि आव्हाने

भारतापुढे नानाविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. १९४७ पूर्वी अनेक संस्थानांचा असा हा देश होता. स्वराज्य मिळताच येथील लोकांवर लोकशाही ही नवीन पद्धत थोपण्यात आली. तथापि ती योग्य रीतीने राबविण्याचे प्रशिक्षणच दिले गेले नाही.

- Advertisement -

Bhartiya Lokashahi - Shodh aani Awhaneया ग्रंथाला मसाप, पुणे चा वैचारिक लेखनाचा पुरस्कार लाभला होता. भारतापुढे नानाविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. १९४७ पूर्वी अनेक संस्थानांचा असा हा देश होता. स्वराज्य मिळताच येथील लोकांवर लोकशाही ही नवीन पद्धत थोपण्यात आली. तथापि ती योग्य रीतीने राबविण्याचे प्रशिक्षणच दिले गेले नाही.

व्यक्ती स्वातंत्र्य, समान वागणूक, बंधुता, परधर्मसहिष्णुता आणि आधुनिकतेचा स्वीकार या सगळ्या गोष्टी हिंदूंनी कुठल्याही राजकीय झगड्याशिवाय स्वीकारल्या; तथापि मुसलमानांना मात्र आधुनिकतेचा स्वीकार आणि परधर्मसहिष्णू असण्याची शिकवण ही मुळातच इस्लामच्या शिकवणुकीत नसल्याने, त्यांच्या या मानसिकतेचा लोकशाहीला असलेला उपद्रव आणि धोका हा टाळता येऊ शकेल का? ही मानसिकता अनुनयाने आणि तुष्टीकरणाने बदलू पाहणाऱ्या गांधींच्या राजकारणाचे व शिकवणुकीचे या प्रक्रियेत नेमके योगदान किती? इतिहासाच्या यथार्थ ज्ञानाचा अभाव, तात्कालीन सत्तालाभासाठी दीर्घकालीन राष्ट्रीय हिताचा बळी देण्याची घातकी वृत्ती आणि जातीचा अभिमान बाळगत निर्माण झालेली सामाजिक बेफिकिरी, हे दोष हिंदूंच्या ठिकाणी असल्यामुळे बहुसंख्य असूनही केवळ लोकशाही राज्यपद्धत ही हिंदूंना सबल करू शकेल का? भारतामध्ये इहवादी शासन असेल असे म्हणणाऱ्या घटनेतच २५ व्या कलमानुसार इहवादी शासनाचा गळा घोटण्याची तरतूद आहे, तिचे काय करायचे? मागासलेपणा हा आर्थिक कमजोरी आहे असं समजण्याऐवजी विशेष पात्रता समजल्यामुळे देशात यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण होते आहे, यावर उपाय काय? अशा अनेक आव्हानांचा शोध घेणारा आणि चिकित्सा करणारा असा हा ग्रंथ आहे.

(पृष्ठसंख्या-₹२७०, मूल्य-₹३७०, सवलत मूल्य-₹२७७, दिलीपराज प्रकाशन, पुणे, ०२०२४४७१७२३, ०२०२४४८३९९५, अमेझॉन- https://amzn.to/3Ijbhqz)

- Advertisement -

©डॉ. सच्चिदानंद शेवडे

Web Title: Indian Democracy – Inventions and Challenges

- Advertisement -