Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडासुधाकर शृंगारे यांनी घेतले संत नाना माऊलींचे दर्शन भागीरथी तीर्थाची शृंगारे यांच्या...

सुधाकर शृंगारे यांनी घेतले संत नाना माऊलींचे दर्शन भागीरथी तीर्थाची शृंगारे यांच्या हस्ते पुजा

लातूर : भाजपाचे लोकसभा उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी चाकूर तालुक्यातील सुगाव येथे संत नाना माऊली यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले . याच वेळी प्रयाग येथून आणलेल्या भागीरथी नदीच्या तीर्थाची त्यांच्या हस्ते पुजा करण्यात आली .

स्वामी सुरेशानंदजी महाराज यांनी यात्रा काढून प्रयाग येथुन भागीरथी नदीचे तीर्थ आणले आहे .या तीर्थाची विधिवत पुजा शृंगारे यांनी केली . मंत्रोच्चारात पुजा संपन्न झाली. त्यानंतर तीर्थाचा कलश डोक्यावर घेत त्यांनी तो ग्रामस्थांकडे सुपुर्द केला. महाराजांनी निवडणुकीतील विजयासाठी शृंगारे यांना आशीर्वाद दिला .

भागीरथी नदीच्या तीर्थाची पुजा करणे हा मोठा सन्मान आहे . तीर्थाची पुजा करण्यास मिळणे हे माझे भाग्य आहे, असे मत उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केले .ग्रामस्थांच्या वतीने शृंगारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . सुगावचे सरपंच विष्णू कातपुरे ,ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह सुगाव येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments