Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडालातुर येथील प्रंचड जनसागरासमोर महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर शृंगारे नतमस्तक

लातुर येथील प्रंचड जनसागरासमोर महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर शृंगारे नतमस्तक

आज लातुर येथे लोकसभेचे उमेदवार श्री सुधाकर शृगारे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लातुर येथील टाऊन हाॅल परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी महायुतीचे उमेदवार श्री सुधाकर शृंगारे म्हणाले की .मी आपले प्रेमाने भारावून गेलो आहे या लोकसभेत मला आपण नरेद्र भाई मोदीसाहेबाकडे लातुरचा चोंकीदार म्हणून सभागृहात पाठवा,व मी लातुर रोड ते गूलबर्गा रेल्वे लाईन तयार करणार आहे व नांदेड ते लातुर हा लोकमार्ग तयार करणार आहे ,लातुर रोड येथे रेल्वे जंंक्शन तयार करणार आहे यावेळी सुधाकर शृगारे हे भावनिक झाले व येथील प्रत्येकाचे हात जोडून नम्र आभार व्यक्त केले .. व या प्रंचड जनसागरासमोर ते नतमस्तक झाले व मी सदैव ऋणात राहीन …उतणार नाही ,मातणार नाही , दिलेला वसा टाकणार नाही ..मी रुकणार नाही ,थकणार नाही असे ते म्हणाले. या वेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष श्री रावसाहेब दानवे पाटील व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आ. विनायक पाटील, आ. सुधाकर भालेराव, नागनाथ निडवदे , माजी आमदार बब्रूवाहन खंदाडे, माजी खासदार गोपाळराव पाटील,अरविंद पाटील निलंगेकर,महापौर सुरेश पवार, शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे,जिला परिषद अध्यक्ष मिलिंद लातूर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शिवसेना जिला प्रमुख संतोष सोमवंशी , नामदेव चाळक , रिपाइंचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे,दलित सेनेचे पासवान गटाचे जिला अद्यक्ष दिलीप गायकवाड, प्रेरणा होनराव, , स्वाती जाधव, नगरसेवक हनुमंत जाकते , गुरुनाथ मागे, प्रवीण कस्तुरे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments