Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाडासुधाकर शृंगारे विजयी होणार ही काळ्या दगडावरील पाढरी रेघ व लातुरात...

सुधाकर शृंगारे विजयी होणार ही काळ्या दगडावरील पाढरी रेघ व लातुरात ही लोकसभेचा विजयी पर्टन होणार -श्री रावसाहेब दानवे पाटील

आज लातूर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रावसाहेबजी दानवे यांच्या उपस्थितीत लातूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा – सेना – रिपाई – रासपा महायुतीचे उमेदवार श्री.सुधाकरजी शृंगारे यांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत श्री.शृंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी सुत्रे हाती घेतल्यापासून गरीबांच्या कल्याणाचा अजेंडा राबवला. सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरू करून त्या राबवल्या. त्यामुळे श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित राहील, असे प्रतिपादन खा.श्री.रावसाहेबजी दानवे यांनी केले.

देशाची सुरक्षा व राष्ट्रहितासाठी यावेळी मतदान होणार आहे. आम्ही राष्ट्रहितासाठी मत मागत आहोत. मतदार बंधू देशाच्या हितासाठी मतदान करणार आहेत. देशातील तमाम जनतेला आज मा.मोदीजी पंतप्रधान पदी हवे असून, मतदारांनी भारत मातेच्या हितासाठी भाजपा उमेदवाराला मत द्यावे असे आवाहन मी केले.

अखेर सभेनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी चौकापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. मान्यवर नेत्यांसह अभिवादन करत ही रॅली छत्रपती शिवाजी चौकात पोहोचली. जिल्ह्यातून आलेले कार्यकर्ते उत्साहाने यात सहभागी झाले होते.

या प्रचार शुभरंभ प्रसंगी आ.श्री.सुधाकरजी भालेराव, आ.श्री.विनायकराव पाटील, लोकसभा उमेदवार श्री.सुधाकरजी शृंगारे, जि.प.अध्यक्ष श्री.मिलिंदजी लातुरे, महापौर श्री.सुरेशजी पवार, माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष श्री.गोविंदजी केंद्रे, लातूर लोकसभा प्रभारी श्री.मिलिंदजी पाटील, जिल्हाध्यक्ष श्री.नागनाथजी निडवदे, श्री.रमेशअप्पा कराड, श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर , शहर जिल्हाध्यक्ष श्री.शैलेशजी लाहोटी , जि.प.उपाध्यक्ष श्री.रामचंद्रजी तिरुके, उपमहापौर श्री.देविदासजी काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोषजी सोमवंशी, श्री.सुभाषजी काटे, श्री.नामदेवजी चाळक, सौ.सुनीताताई चाळक, रिपाईचे श्री.चंद्रकांतजी चिकटे, रासपचे श्री.दादासाहेब करपे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसेच महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments