महिला पंच पुरुषांच्या क्रिकेट सामन्यात

- Advertisement -

महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडतात. क्रिकेटच्या मैदानात पुरुषांप्रमाणे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात महिला खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केल्याचे आपण नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकात पाहिले. पण आता ऑन फिल्ड अंपायर म्हणून देखील महिला मैदानात उतरणार आहेत. रविवारी न्यू दक्षिण वेल्स आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुरुष गटातील सामन्यात कॅरी पोलोस्का पंच म्हणून मैदानात उतरणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात पंचाची कामगिरी करणारी ती पहिली महिला असेल. या सामन्यातील कामगिरीपूर्वी कॅरी म्हणाल्या की, मी एकदाही क्रिकेट खेळलेले नाही. मात्र क्रिकेट खेळाविषयी मला चांगली जाण आहे. पंच होण्यासाठीच्या पात्रता परीक्षेत अनेकदा अपयश आले. मात्र मी प्रयत्न सोडले नाहीत.

याशिवाय आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी पहिल्यांदाच महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीने महिलांच्या आगामी टी-२० विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीतील सामन्यांसाठी चार महिला पंचाच्या नावाची घोषणा केली. कॅरी पोलोस्कासह न्यूझिलंडची अनुभवी खेळाडू कॅथलिन क्रॉस, इंग्लंडची रेडफर्ड आणि वेस्ट इंडिजच्या जॅकलिन विलियम्स यांचा समावेश आहे. महिला विश्वचषकाच्या पात्रता फेरीत बांगलादेश, चीन, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, थायलंड आणि झिम्बाब्वे या देशांतील संघ पात्रता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यातील अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. पात्रता फेरीतील सामने २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान थायलंडमध्ये रंगणार आहेत. या सामन्यांसाठी चार महिला पंचांची आयसीसीने नियुक्ती केली. याशिवाय दोन पुरुष पंचांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -