होम क्रीडा समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन

समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन

5
0

श्री गणेश क्रिकेट क्लब (ब ),नागवनटेक व पाटण तालुका धनगर समाज यांच्या वतीने खास धनगर समाजातील क्रिकेट संघांसाठी “भगवा चषक-२०१९ ” क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते.

नवीमुंबई येथील मानसरोवर रेल्वे स्टेशनलगत असलेल्या मोकळ्या मैदानात श्री गणेश क्रिकेट क्लब (ब) ,नागवनटेक व पाटण तालुका धनगर समाज यांच्या वतीने धनगर समाजातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने खास धनगर समाजातील क्रिकेट संघांसाठी “भगवा चषक-२०१९ ” क्रिकेट सामने आयोजित केले होते. यामध्ये मुंबई,विरार,जुहूगाव,वाशी,कळंबोली,कुर्ला,पाटण-सातारा येथील धनगर समाजातील एकूण १८ क्रिकेट संघानी सहभाग घेतला. समर्थ सद्गुरू क्रिकेट क्लब, दाडोली व शिवशक्ती क्रिकेट क्लब ,डोनीचावाडा यांच्या मध्ये अंतिम सामना रंगला  यामध्ये समर्थ सद्गुरू क्रिकेट क्लब, दाडोली विजयी झाला.

या क्रिकेट सामन्यात विजयी ठरलेल्या समर्थ सद्गुरू क्रिकेट क्लब, दाडोली यांना प्रथम पारितोषिक  १० हजार रुपये रोख व  चषक ,उपविजता संघ शिवशक्ती क्रिकेट क्लब ,डोनीचावाडा यांना द्वितीय पारितोषिक ७००० हजार रुपये रोख व चषक, तर तृतीय पारितोषिक युवा जल्लोष येडगेवाडी यांना ५००० हजार रुपये व चषक तर  उत्कृष्ट फलंदाज गणेश येडगे ( येडगेवाडी), उत्कृष्ट गोलंदाज धोंडिबा झोरे (समर्थ सद्गुरू क्रिकेट क्लब, दाडोली),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संजू यमकर (शिवशक्ती क्रिकेट क्लब,डोनीचावाडा ) तर उत्कृष्ट समालोचलक बाबू झोरे आणि सतीश शेळके यांना पारितोषिक देऊन धनगर समाजाचे नेते, शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख,शिवसेना माण तालुका संपर्क प्रमुख शंकर वीरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी यशवंत सेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख अभिजित कोकरे,धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ,पत्रकार दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड,खजिनदार अविनाश लबडे,कार्यकारणी सदस्य गणेश बारगीर,तुषार धायगुडे,बाबुराव झोरे,प्रकाश शेळके,बाबुराव शेळके,सतीश शेळके,सुरेश शेळके आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

क्रिकेटचे सामने यशस्वी करण्यासाठी गणेश क्रिकेट क्लबचे सतीश शेळके,अंकुश शेळके,सुभाष शेळके,विजय शेळके,राम शेळके,संतोष शेळके आदी सह क्लबच्या सदस्यांनी त्याचे पाटण तालुका धनगर समाज बांधवानी यासाठी मेहनत घेतली.