Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाभारत/श्रीलंका : टी टाईमपर्यंत भारताच्या 3 बाद 404 धावा: विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं...

भारत/श्रीलंका : टी टाईमपर्यंत भारताच्या 3 बाद 404 धावा: विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 19वं शतक ठरलं.

नागपूर : टीम इंडियाने नागपूर कसोटीत उपहारापर्यंत १९९ धावांची आघाडी घेतली आहे. ३ बाद ४०४ धावा अशी भारताची तिसऱ्या दिवशी उपहारापर्यंत परिस्थिती आहे.

कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाने मोठी मजल मारली. उपहारापर्यंत चेतेश्वर पुजारा १४३ आणि विराट कोहली १२४ धावांवर खेळत होते.

विराटचं कर्णधार म्हणून बारावं शतक, सुनील गावसकरांचा विक्रम मोडीत

कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनील गावसकर यांचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे. नागपूर कसोटीत मुरली विजय, चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही दमदार शतक झळकावलं. विराटच्या कसोटी कारकीर्दीतलं हे १९वं शतक ठरलं.

१० चौकारांसह विराटने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतील सलग दुसरं शतक साजरं केलं. कर्णधार या नात्याने विराटचं हे बारावं कसोटी शतक ठरलं. त्यामुळे या शतकासोबतच विराटने कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा सुनिल गावसकर यांचा विक्रम मोडीत काढला.

गावसकर यांनी कर्णधार असताना कसोटीत ११ शतकं ठोकली होती. दरम्यान कसोटीच्या आज तिसऱ्या दिवशी भारताने २ बाद ३७३ धावांची मजल मारली आहे. सोबतच या कसोटीवर भारताने आपली पकड आणखी मजबूत केली.

दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हाच सलामीचा मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकांनी टीम इंडियाने नागपूर कसोटीवर आपली पकड मजबूत केली होती. टीम इंडियाने पहिल्या डावात २ बाद ३१२ धावांची मजल मारत श्रीलंकेवर १०७ धावांची भक्कम आघाडी घेतली होती.

मुरली विजयने कसोटी कारकीर्दीतलं दहावं शतक साजरं केलं. त्याने २२१ चेंडूंत १२८ धावांची खेळी केली. यात त्याने ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर पुजारानही २८४ चेंडूंत तेरा चौकारांसह नाबाद १२१ धावांची खेळी उभारली. पुजाराचं कारकीर्दीतलं हे १४ वं कसोटी शतक ठरलं. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 209 धावांची महत्वपूर्ण भागिदारी रचली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments