Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडाएबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

एबी डिविलियर्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली आहे. तसेच तो आता तीनही फॉरमॅटमधून निवृत्त होतोय.

दक्षिण आफ्रिकेसाठी डिव्हिलियर्सने 2004 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. निवृत्तीचा निर्णय हा माझ्यासाठीही कठीण होता, पण बराच वेळ विचार केल्यांनतर मी हा निर्णय घेतला आहे तसेच इतरांनाही खेळण्याची संधी मिळावी असे मला वाटते.

डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78  ट्वेन्टी ट्वेन्टी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आतापर्यंतच्या दिलेल्या सहकार्याबद्दल इतर खेळाडू आणि स्टाफचे आभार मानून मी क्रिकेटला अलविदा करत आहे, दक्षिण आफ्रिका आणि जगभरातील चाहत्यांनी मला भरभरून प्रेम दिले त्यासाठी मनपूर्वक आभार! पुढे खेळण्याबाबतचे माझे कोणतेही प्लान्स नाही आहेत.

डिव्हिलियर्सनं वनडेत १६ चेंडूत अर्धशतक ठोकलेय. तर ३१ चेंडूत शतक झळकावलेय. तर ६४ चेंडूत १५० धावा केल्यात. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने २७८ या सर्वाधिक धावा केल्यात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments