Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाउपकर्णधार अजिंक्य रहाणे ‘बाबा’ झाला

उपकर्णधार अजिंक्य रहाणे ‘बाबा’ झाला


देशभरात सध्या नवरात्रोत्सव सुरु आहे. ऐन नवरात्रोत्सवात अंजिक्य रहाणेच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाबा झाला आहे. अंजिक्य रहाणेची पत्नी राधिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

“अजिंक्य, बाबा झाल्याबद्दल तुझे अभिनंदन, तुझी परी आणि तिची आई या दोघीही सुखरुप असतील अशी मी आशा करतो. तुझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण आता सुरु झाले आहेत,” असे ट्विट हरभजनने केले आहे.

अजिंक्य सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. या दौऱ्यापूर्वी अजिंक्यने तो बाबा होणार असल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली होती. त्यावेळी अजिंक्यने राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंट मिळाल्या होत्या.

अजिंक्य रहाणे आणि राधिका हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. ते दोघेही एकमेकांचे शेजारी होते. सप्टेंबर 2014 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments