टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाला कन्यारत्न प्राप्ती

मुंबई : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी गोड बातमी आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला कन्यारत्नप्राप्ती झाल्याची माहिती त्याने फेसबुक आणि ट्विटरवर एक छानसा फोटो पोस्ट करत त्याने ही आनंदाची बातमी साऱ्यांना सांगितली.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. दुसऱ्या सामन्यात हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादव याला कन्यारत्नप्राप्ती झाली.

https://twitter.com/y_umesh/status/1344916851822772224

उमेश यादवने मुलगी झाली, असं कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. “माझी चिमुकली राजकुमारी, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्या येण्याने मी खूपच आनंदी झालो आहे”, असा मजकूर फोटोवर लिहिण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here