Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाईडन गार्डन्सवर पहिली डे-नाईट कसोटी

ईडन गार्डन्सवर पहिली डे-नाईट कसोटी

Eden Gardens First Day-Night cricket TEST match IND VS BANभारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. ‘डे-नाइट’ आणि गुलाबी चेंडूने खेळला जाणारा भारताचा पहिला कसोटी म्हणून या सामन्याचे वेगळे महत्त्व आहे. इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा एक डाव व 130 धावांनी पराभव केला होता. 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारत विरुद्ध बांगलादेश असा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडे आल्यानंतर सारे चित्र पालटले आणि गुलाबी चेंडूची ही कसोटी व्हावी या त्यांच्या प्रयत्नांना यश आले. डे-नाइट कसोटी खेळण्यासाठी कर्णधार विराट कोहलीचे मन वळवताना गांगुली यांना अवघे तीन सेकंदच लागले. त्याने त्वरित या कसोटीला होकार दिला. बांगलादेश संघ भारत दौऱ्यावर येण्याआधीच गांगुली यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी संवाद साधून डे-नाइट कसोटी खेळण्यासाठी त्यांचे मन वळविले.

गुलाबी चेंडूने खेळण्याचा वेगळा अनुभव दोन्ही संघांना मिळणार आहे. एरवी कुकाबुरा कंपनीच्या चेंडूंचा वापर केला जात असताना या कसोटीसाठी मात्र एसजीचे चेंडू वापरले जाणार आहेत. त्यांचा परिणाम नेमका कसा असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारताने ही कसोटी जिंकली तर हा भारतातील १२वा मालिकाविजय असेल. त्या अर्थानेही या कसोटीचे स्वतंत्र महत्त्व आहे.

या सामन्यासाठी सर्व नामांकित क्रिकेटपटूंना आमंत्रित करण्यात आले असून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिनाही खास, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सामना पाहण्यासाठी येणार आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर अशी क्रिकेटमधील अग्रणी नावे या सामन्यासाठी कोलकात्यात दाखल झाली आहेत.

दुसऱ्या कसोटी मधील खेळाडू

भारत
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, ऋद्धिमान साहा, उमेश यादव, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी

बांग्लादेश
शदमन इस्लाम, इमरुल केस, मोमिनुल हक, मोहम्मद मिथुन, मुशफ़िकुर रहीम, महमूदुल्लाह, लिटन दास, नईम हसन, अल-अमीन होसैन, अबु जाएद, एबादत होसैन

सामन्याचे वेळापत्रक

दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल.

पहिलं सत्र: दुपारी 1 ते 3

उपाहाराची वेळ : दुपारी 3 ते 3.40

दुसरं सत्र: 3.40 ते 5.40

चहापानाची वेळ: संध्याकाळी 5.40 ते 6

तिसरं सत्र: संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments