Friday, March 29, 2024
Homeक्रीडाबॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे फेक अकाउंट, शेकडो तरुणींची फसवणूक

बॉडीबिल्डर सुहास खामकरच्या नावे फेक अकाउंट, शेकडो तरुणींची फसवणूक

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत देश-विदेशात अनेक किताब मिळवणाऱ्या सुहास खामकर यांच्या नावाचा फेक फेसबुक अकाऊण्ट तयार करुन अनेक तरुणींची फसवणूक करण्यात आली. हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यामुळे गोंधळ उडाला आहे.

या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे. याबाबत खबरदारी म्हणून यांविरोधात खामकर यांनी मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. सुहास खामकर यांचे देश विदेशात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर अनेक जण सुहास खामकर यांना फॉलो करत असतात. याचाच फायदा काही समाजकंटक घेत आहेत. खामकर यांच्या नावाचं फेसबुकवर खोटं अकाऊंट तयार करुन तरुणी आणि महिलांशी संवाद साधला जात असल्याचा आरोप होत आहे.

अनेक वेळा तर तरुणींना आपण सुहास खामकर बोलत आहोत, अशा प्रकारचा फोनही केला जातो. इतकंच नाही, तर त्यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोललं जातं, असा दावा केला जात आहे. या प्रकारामुळे सुहास खामकर यांची बदनामी होत आहे. याबाबत खबरदारी म्हणून यांविरोधात खामकर यांनी मुंबईतील टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत सायबर कक्षाद्वारे ही चौकशी होणार आहे.

सुहास खामकर यांच्या नावाने जी अकाउंट आहेत, ती व्हेरिफिकेशन केलेली म्हणजे निळी टिकमार्क केलेली आहेत. त्यामुळे कोणीही इतर अकाऊंटसोबत व्यवहार करु नये, जर आपणास कोणी खोटा फोन केला असल्यास आपण खामकर यांच्याशी अथवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सुहास खामकर यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments