Friday, March 29, 2024
Homeक्रीडाहॉकीच्या दुनियेतला जादुगार मेजर ध्यानचंद यांची ११४ वी जयंती

हॉकीच्या दुनियेतला जादुगार मेजर ध्यानचंद यांची ११४ वी जयंती

हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम

आज २९ ऑगस्ट म्हणजे राष्ट्रीय क्रीडा दिन. आजच्या दिवशीच सन १९०५ मध्ये भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता. देशातील सर्व खेळाडूंना प्रेरणास्थान ठरणाऱया या महान हॉकीपटूचा जन्म दिवस देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊयात जर्मनीचा हुकमशहा हिटलटरलाही भुरळ पाडणाऱ्या ध्यानचंद यांच्याबद्दल जाणून घेऊया.

मेजर ध्यानचंद कोण ?

ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ साली राजपुत घराण्यात झाला. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली.

मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यान सिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती.

जर्मनीचा हुकमशहा हिटलरला ही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ध्यानचंद यांनी आपल्याला भारतासाठीच खेळायचे असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता.हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments