Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाभारत - श्रीलंका आजपासून भिडणार

भारत – श्रीलंका आजपासून भिडणार

India Sri Lanka Virat Malinga,India, Sri Lanka, Virat kohli, lasith Malinga,Malingaक्रिकेट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील T20 मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे . यंदाच्या कॅलेंडर वर्षातील दोन्हीं संघाचा हा पहिला सामना आहे. ही मालिका तीन सामन्यांची होणार आहे. यातील पहिला सामना (5 जानेवारी) गुवाहाटीला खेळवला जाणार आहे. दुसरा सामना  (7 जानेवारी) इंदूर, तर तिसरा सामना (10 जानेवारी) पुण्यात खेळवण्यात येणार आहे. अनुक्रमेतील हे सामने संध्याकाळी 7 वाजता खेळवले जाणार आहे.

या मालिकेसाठी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहितच्या गैरहजेरीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी असणार आहे. त्याचप्रमाणे पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला जसप्रीत बुमराच्या मालिकेतील पुनरागमना मुळे भारतीय गोलंदाजीची फळी मजबूत झाली आहे. सामन्या आधी दोन्ही संघाने मैदानात  जोरदार सराव केला. भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ वर्षाची सुरुवात विजयी सलामीने करण्याचा प्रयत्न करतील.

संभाव्य संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनुष्का गुणतिलक, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्व्हा, इसुरु उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदु हसरंगा, लाहिरु कुमारा, कुसल मेंडिस, लक्षण संदाकन आणि कसून राजिता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments