Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाभारतीय क्रिकेटर मनीष पांडे 'या' अभिनेत्रीशी करणार विवाह

भारतीय क्रिकेटर मनीष पांडे ‘या’ अभिनेत्रीशी करणार विवाह

Indian cricketer Manish Pandey will marry the actress Ashrita Shetty
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडे. मनीष पांडे त्याच्या आयुष्यातील एक नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने त्याच्या आयुष्याचा जोडीदार शोधला आहे. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीशी तो लग्नगाठ बांधणार आहे. एका वृत्तानुसार, IPL शतकवीर मनीष पांडे २ डिसेंबर २०१९ ला लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रीता शेट्टी हिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. त्याच्या विवाहाचा मुहूर्तदेखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. मनीष पांडे आधी विंडिज दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी २० सामन्यात
भारताचे प्रतिनिधित्व करत होता. आता मनीष पांडे सध्या विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे या स्पर्धेनंतर तो विवाहबंधनात अडकणार आहे असे सांगितले जात आहे.

मनीष पांडे २ डिसेंबर २०१९ ला लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. मुंबईमध्ये त्याचा विवाह संपन्न होणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रीता शेट्टी आणि मनीष पांडे हे दोघे दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये होते, अशी चर्चा होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments