Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeक्रीडाIPL 2020 : लिलावानंतर असे आहेत आयपीएलचे संघ

IPL 2020 : लिलावानंतर असे आहेत आयपीएलचे संघ

IPL 2020 Here are the IPL teams after the auctionकोलकाता : 2020 च्या आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव गुरुवारी कोलकातामध्ये पार पडला. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 33 भारतीय आणि 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ‘पॅट कमिन्स’ आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी 50 लाखांची किंमत कोलकाता नाईट रायडर्सने मोजली आहे. तर ‘पियुष चावला’ हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले असून त्याच्यासाठी त्यांनी तब्बल 6 कोटी 75 लाख रुपयांची बोली लावली आहे.

1. चेन्नई सुपर किंग्स 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – एमएस धोनी, सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायुडू, मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिशेल सँटेनर, मोनू कुमार, एन जगदीसन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर , दीपक चाहर, केएम आसिफ.

लिलावात घेतलेले खेळाडू – पियूष चावला (6.75 कोटी), सॅम करन (5.5 कोटी), जोश हेजलवुड (2 कोटी), आर साई किशोर (20 लाख)

2. दिल्ली कॅपिटल्स 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, इशांत शर्मा, अमित मिश्रा, अवेश खान, संदीप लामिछाने, कागिसो रबाडा, कीमो पॉल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आर अश्विन, अजिंक्य रहाणे.

लिलावात घेतलेले खेळाडू – शिमरॉन हेटमायर (7.75 कोटी), मार्कस स्टोईनिस (4.80 कोटी), अलेक्स कॅरी (2.4 कोटी), जेसन रॉय (1.5 कोटी), ख्रिस वॉक्स (1.5 कोटी), मोहित शर्मा (50 लाख), तुषार देशपांडे (20 लाख), ललित यादव (20 लाख)

3. किंग्स इलेव्हन पंजाब 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, निकोलस पूरन, मनदीप सिंग, के गॉथम, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंग, हार्दस विल्जोइन, एम अश्विन, जे सुचित, हरप्रीत ब्रार आणि दर्शन नळकंडे.

लिलावात घेतलेले खेळाडू- ग्लेन मॅक्सवेल(10.75 कोटी), शेल्डन कॉट्रेल (8.5 कोटी), रवी बिश्नोई(2 कोटी), प्रभसिमरन सिंग (55 लाख), दीपक हुडा (50 लाख), जेम्स निशाम (50 लाख), इशान पोरेल(20 लाख), ख्रिस जॉर्डन (75 लाख), तजिंदर धिल्लन(20लाख)

4. कोलकाता नाईट रायडर्स

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – शुबमन गिल, सिद्धेश लाड, आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक, रिंकू सिंग, नितीश राणा, सुनील नरेन, कुलदीप यादव, हॅरी गुर्नी, लकी फर्ग्युसन, कमलेश नगरकोटी, शिवम मावी, प्रसिध्दा कृष्णा, संदीप वॉरियर

लिलावात घेतलेले खेळाडू – पॅट कमिन्स (15.5 कोटी), ओएन मॉर्गन (5.25 कोटी), वरुण चक्रवर्ती (4 कोटी), टॉम बंटन (1 कोटी), राहुल त्रिपाठी (60 लाख), प्रवीण तांबे (20 लाख), एम सिद्धार्थ (20 लाख), ख्रिस ग्रीन (20 लाख), निखिल नाईक (20 लाख)

5. मुंबई इंडियन्स 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, किरॉन पोलार्ड, क्विंटन डी कॉक, मिशेल मॅक्लेनाघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पंड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, ईशान किशन, अंकुल रॉय, धवल कुलकर्णी, आदित्य तारे, शेरफेन रुदरफोर्ड, जयंत यादव.

लिलावात घेतलेले खेळाडू- नॅथन कुल्टर-नाईल (8 कोटी), ख्रिस लिन (2 कोटी), सौरभ तिवारी (50 लाख), मोहसीन खान (20 लाख), दिग्विजय देशमुख (20 लाख), राजकुमार बलवंत राय सिंग (20 लाख)

6. राजस्थान रॉयल्स 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरर, वरुण ऍरॉन, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, अंकित राजपूत.

लिलावात घेतलेले खेळाडू – रॉबिन उथप्पा (3 कोटी), जयदेव उनाडकट (3 कोटी), यशस्वी जयस्वाल (2.4 कोटी), कार्तिक त्यागी (रु. 1.3 कोटी), अँड्र्यू टाय (1 कोटी), टॉम करन (1 कोटी), अनुज रावत (80 लाख), डेव्हिड मिलर (75 लाख रुपये), ओशाण थॉमस (50 लाख रुपये), आकाश सिंग (20 लाख), अनिरुद्ध जोशी (20 लाख)

7.रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – विराट कोहली, मोईन अली, युजवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, पवन नेगी, उमेश यादव, गुरकीरतमन, देवदत्त पाडीक्कल, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी.

लिलावात घेतलेले खेळाडू – ख्रिस मॉरिस (10 कोटी), ऍरॉन फिंच (4.4 कोटी), डेल स्टेन (2 कोटी), केन रिचर्डसन (1.5 कोटी), ईसूरु उडाना (50 लाख), जोशुआ फिलिप (20 लाख), पवन देशपांडे (20 लाख), शहाबाज अहमद(20 लाख)

8.सनरायझर्स हैद्राबाद 

लिलावाआधी संघात असलेले खेळाडू – केन विल्यम्सन, डेव्हिड वॉर्नर, मनीष पांडे, विजय शंकर, राशीद खान, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, जॉनी बेअरस्टो, वृध्दिमान साहा, श्रीवत्स गोस्वामी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, शाहबाज नदीम, बिली स्टॅनलेक, बासिल थंपी, टी नटराजन.

लिलावात घेतलेले खेळाडू- मिशेल मार्श (2 कोटी), प्रियम गर्ग (1.9 कोटी), विराट सिंग (1.9 कोटी), फॅबियन ऍलन (50 लाख), संदीप बावनका (20 लाख), अब्दुल समद (20 लाख), संजय यादव (20 लाख)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments