Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडापाणीपुरी विक्रेता मुंबईकर क्रिकेटपटूचा द्विशतक; जागतिक विक्रम मोडला

पाणीपुरी विक्रेता मुंबईकर क्रिकेटपटूचा द्विशतक; जागतिक विक्रम मोडला

Yashasvi jaiswal mumbai cricket top of the world
मुंबई : मुंबईत पाणीपुरीचा व्यवसाय करणा-या मुंबई संघाचा सलामीवीर ‘यशस्वी जयस्वाल’ने प्रथम श्रेणी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावला. जयस्वाल हा जगातील सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. जयस्वालने 44 वर्षांचा जागतिक विक्रम मोडला.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यात यशस्वीने आपल्या नावे हा विक्रम नोंदवला. यशस्वीचं वय 17 वर्ष 292 दिवस आहे. यापूर्वी सर्वात कमी वयात द्विशतक ठोकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एलन बारो याच्या नावे होता. एलनने 1975 मध्ये दक्षिण आफ्रिकेत नोंदवलेला विक्रम यशस्वीने तब्बल 44 वर्षांनी मोडित काढला.

यशस्वीने उदरनिर्वाहासाठी मुंबईत पाणीपुरी विकण्याचा पर्यायही निवडला होता. आझाद मैदानात तो पाणीपुरी आणि फळं विकायला मदत केली. काही वेळा उपाशीपोटी झोपण्याची वेळ आल्याचंही तो सांगतो. मात्र आता यशस्वीची कामगिरी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे.

यशस्वीने 154 चेंडूंमध्ये 203 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या द्विशतकी खेळीला 12 षटकार आणि 17 चौकारांचा साज होता. बंगळुरुत खेळवल्या जात असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने झारखंडविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यशस्वीच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने तीन विकेट गमावून 358 धावा केल्या.

‘यशस्वी’ कामगिरी…

विजय हजारे ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमातील यशस्वीचं हे तिसरं शतक आहे. यशस्वीने पाच सामन्यांमध्ये आतापर्यंत 585 धावा ठोकल्या आहेत. टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज तो ठरला आहे. याच टूर्नामेंटमधून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

हजारे ट्रॉफीत तिसरा द्विशतकवीर…

विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकणारा यशस्वी हा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी केरळचा संजू सॅमसन आणि उत्तराखंडच्या कर्ण कौशलने ही कामगिरी बजावली आहे. सॅमसनने याच वर्षी गोव्याविरुद्ध 212 धावा केल्या, तर कौशलने गेल्या मोसमात सिक्कीमविरोधात 202 धावांची खेळी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments