Friday, March 29, 2024
Homeक्रीडाधोनीच्या मुलीचा असाही हट्ट!

धोनीच्या मुलीचा असाही हट्ट!

MS Dhoni, Daughterआयपीएल सीझनमध्ये कॅप्टन महेन्द्र सिंग धोनीची ३ वर्षांची मुलगी जिवा हिचीच  सोशल मीडियावर धूम आहे. तिचे फोटो सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. अलीकडे जिवा किंगखान शाहरूख खानसोबत स्टेडियममध्ये मस्ती करताना दिसली होती. आयपीएल सीझनमध्ये जिवा अनेकदा स्टेडियमवर दिसते. तिचे पापा मैदानात चौकार-षट्कार लावत असतात तर इकडे जिवाची धम्माल मस्ती सुरू असते. सध्या जिवाच्या अशाच धम्माल मस्तीचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात जिवा  एक वेगळाच हट्ट धरून बसली आहे.

होय, अलीकडे किंग्स इलेवन पंजाब व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल सामना रंगला. या सामन्यात धोनी मैदानावर फलंदाजी करत होती. अन् जिवा पापाचा खेळ बघत, मस्ती करत होती. अचानक मैदानावरच्या स्क्रिन्सवर जिवाला पापाचा चेहरा दिसला अन् जिवा एक वेगळाच हट्ट धरून बसली. पापा को बुलाओ ना, पापा को जल्दी बुलाओ ना…मुझे पापा को हग करना है…अशी  विनंती जिवा वारंवार करताना या व्हिडिओत दिसतेय. निश्चितपणे जिवाचा हा अंदाज प्रचंड क्यूट आहे. तिच्या या क्यूट अंदाजाने लोकांना वेड लावले आहे. म्हणूनच हा  गत १८ तासांत २२ लाखांवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. धोनीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments