पी व्ही सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये

- Advertisement -

नवी दिल्ली : ऑलिंपिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधू आणि डेन्मार्क ओपन विजेता किदाम्बी श्रीकांत यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय. तर सायना नेहवालला मात्र दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.

पॅरिसमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत सिंधूने जपानच्या सायाका ताकाहाशीला २१-१४, २१-१३ असे सरळ पराभूत केले. क्वार्टरफायनलमध्ये तिचा मुकाबला चीनच्या चेन यूफीशी होणार आहे.

पुरुष एकेरीत श्रीकांतने हाँगकाँगच्या वोन्ग विंग की विन्सेंटला हरवले. ३७ मिनिटे चाललेल्या या खेळात श्रीकांतने २१-१९, २१-१७ अशी बाजी मारली. दुसरीकडे १५व्या स्थानी असलेल्या बी साई प्रणीथला जपानच्या केंटा निशिमातोकडून १३-२१, १७-२१ असे पराभूत व्हावे लागले.

- Advertisement -

माजी नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. पाचव्या स्थानावरील अकने यामागुचीने सायनाला २१-९, २३-२१ असे हरवले.

- Advertisement -