Thursday, March 28, 2024
Homeक्रीडारोहित शर्मानं तोडला सेहवाग, सचिन, आणि युवराजचा विक्रम

रोहित शर्मानं तोडला सेहवाग, सचिन, आणि युवराजचा विक्रम

पोर्ट एलिझाबेथ: रोहित शर्मानं वन-डेत द्विशतक आणि टी-२०त शतक ठोकत वर्षाखेरीस  क्रिकेटविश्वात धुमाकुळ घातला होता. दोन कसोटीतील चार डावात त्याला फक्त ७८ धावा करता आल्या होत्या. यावेळी त्याची ४७ ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती. कसोटीनंतर पहिल्या चार वडेतमध्ये तो अडखळत खेळत असल्याचे पहायला मिळाले. पण पाचव्या वन-डेमध्ये शतकी खेळी करत २०१८ मधील पहिले शतक झळकावले आहे. रोहित शर्मानं पाचव्या वन-डेमध्ये १२६ चेंडूत ११५ धावांची संयमी खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं ११ चौकार आणि चार गगणचुंबी षटकार खेचले. या खेळीसह त्यानं अनेक विक्रमांना गवसणा घातली आहे. सचिन, युवराज आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गज खेळाडूंचा विक्रम त्यानं मोडला आहे. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षातमध्ये रोहित शर्मानं ६५ षटकार लगावले आहेत  २०१७-०८ च्या वर्षात रोहितनं ६५ षटकार लगावले होते. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने २६५ षटकार ठोकले आहेत. त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रम त्यानं मोडित काढला आहे. सचिनच्या नावावर २६४ षटकार आहेत. तर युवराज सिंगच्या नावावर २५१ आणि सौरव गांगुलीच्या नावावर २४७  षटकारांची नोंद आहे. भारताकडून सर्वाधिक षठकार माजी कर्णधार धोनीच्या नावावर आहेत. धोनीने आतापर्यंत ३३८  षठकार लगावले आहेत.

सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे हे १५ वे शतक तर आंतरराष्ट्रीय करियरमधील १७ वे शतक आहे. रोहित शर्मानं विरेंद्र सेहवागच्या शतकाचाही विक्रम मोडीत काढला. सलामीवीर म्हणून सेहवागनं १४ शतके ठोकली आहेत. काल रोहित शर्मानं १५ वे शतक झळकावत सेहवागचा विक्रम मोडित काढला. रोहित शर्माच्या पुढे आता फक्त सचिन तेंडूलकर(४५) आणि गांगुली (१९) हे दिग्गज आहेत. सलामीवीर म्हणून भारताकडून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यामध्ये धवन १३ शतकासह पाचव्या स्थानावर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments