Thursday, March 28, 2024
Homeक्रीडाBCCI च्या अध्यक्षपदी सौरव गांगुली

BCCI च्या अध्यक्षपदी सौरव गांगुली

sourav ganguly to be new BCCI president
जगातील सर्वात शक्तीशाली क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचा अध्यक्षपद निवडण्यासाठी बैठक झाली होती.

या बैठकीवेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि एन श्रीनिवास हे गट आमने-सामने होते. श्रीनिवासन गटाकडून ब्रजेश पटेल तर ठाकूर गटाकडून प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुली यांचे नाव सुचवले जात होते. अखेर काल झालेल्या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर सौरव गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

क्रिकेटमधील या दोन दिग्गज गटांनी आपआपले उमेदवार अध्यक्षपदी बसवण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. अखेर यामध्ये क्रिकेटमधील दादा अर्थात सौरव गांगुलीने बाजी मारली. मात्र त्याचवेळी ब्रजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावरही सहमती झाली.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह बीसीसीआय सचिव, तर अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर यांच्या गळ्यात कोषाध्यक्षाची माळ पडू शकते.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता पुढील 10 महिन्यांसाठी अध्यक्षपदाची धुरा गांगुली सांभाळेल. सध्या गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गांगुलीने स्वत: भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यामुळे गांगुलीला मैदानातील अनुभव तर आहेच, पण प्रशासनातील अनुभव त्याच्या पाठिशी आहे.

गांगुली-अमित शाह भेट

अध्यक्षपदाच्या शर्यतीत श्रीनिवासन गटाने प्रचंड जोर लावला होता. श्रीनिवासन यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन ब्रजेश पटेल यांची दावेदारी सादर केली होती. मात्र गांगुलीनेही स्वत: अमित शाह यांची भेट घेऊन बीसीसीआय अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments