Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडाठाणे महापौर वर्षा मँरेथाँन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात: महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे महापौर वर्षा मँरेथाँन स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात: महापौर मिनाक्षी शिंदे

ठाणे: ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अँथलेटिक्स संघटनेच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र राज्य ऑथलेटिक संघटनेच्या मान्यतेने रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2019 रोजी 30 सावी ठाणे महापौर मँरेथाँन होणार आहे. सदर स्पर्धेची तयारी ही मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. या स्पर्धेमध्ये राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभाग मोठय़ाप्रमाणावर असतो. तसेच इतर गटांतून होणाऱ्या  स्पर्धांमध्ये देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून अनेक स्पर्धकांनी नोंदणी केली असून या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

कोल्हापूर, सांगली जिह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निश्चितच मोठे संकट राज्यासमोर उभे राहिलेले आहे. यामध्ये अनेक नागरिक बाधीत झालेले आहेत. या सर्व बाधितांना मदतीचा हात पुढे करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे व यापूर्वी झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठाणे शहराने पुढाकार घेवून मदतीचा हात दिलेला आहे हे सर्वत्र ज्ञात आहे. आज या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची ठाणे महापौर वर्षा मँरेथाँन स्पर्धा रद्द करण्यात यावी असा सूर उमटत असून या कामी खर्च होणारा निधी पूरग्रस्तांना देण्यात यावा अशी मागणी भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केली आहे.

ठाणे महापौर वर्षा मँरेथाँन स्पर्धेसाठी एकूण 40 लाख इतका खर्च असून स्पर्धेची संपूर्ण तयारीही झाली आहे. आजच्या घडीस अचानकपणे स्पर्धा रद्द केल्यास आजवर करण्यात आलेला खर्च वाया जाईल. पूरग्रस्तांना मदत करावयाची झाल्यास ती वेगळ्या माध्यमातून करणे देखील शक्य आहे. तसेच केवळ ठाणे महापालिका नव्हे तर मीरा भाईदर महानगरपालिकेने देखील 18 ऑगस्ट याच दिवशी मँरेथाँन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी एकूण 1 कोटी इतका खर्च करण्यात येणार आहे. तुलनेत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणारा खर्च हा अत्यल्प आहे. मीरा- भाईदर महापालिकेत भाजपाची सत्ता असून भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी मीरा भाइदर महानगरपालिकेच्या महापौरांना देखील वर्षा  मँरेथाँन स्पर्धा रद्द करण्याबाबत सूचना करणे आवश्यक आहे असे मला वाटते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments