Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाभारतीय संघाचा असा आहे न्यूझीलंड दौरा

भारतीय संघाचा असा आहे न्यूझीलंड दौरा

Virat Kohliनवी दिल्ली : लाखो क्रिकेट चाहत्यांच्या नजरा भारताच्या न्यूझीलंड दौ-याकडे लागल्या आहेत. भारतीय संघ सहा आठवड्यांच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंड येथे दाखल झाला आहे.

न्यूझीलंड दौऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आम्ही पहिल्या चेंडूपासून न्यूझीलंडवर दबाव ठेऊ असा इशारा विराट कोहलीने दौऱ्याआधी दिला आहे. तर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

न्यूझीलंड दौऱ्याआधी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पण सलामीवीर शिखर धवन आणि जलद गोलंदाज इशांत शर्मा हे दोन खेळाडू जखमी झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला. शिखर धवनच्या जागी टी-२० संघात संजू सॅमसन तर वनडे संघात पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे.

टी-२० मालिकेसाठीचा भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.

वन डे साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दूबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, महम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर आणि केदार जाधव

असा आहे भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा….

टी-२० मालिका (सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता सुरू होणार)

पहिली टी-२० : ऑकलंड- २४ जानेवारी २०२०

दुसरी टी-२०: ऑकलंड- २६ जानेवारी २०२०

तिसरी टी-२०: हॅमिल्टन- २९ जानेवारी २०२०

चौथी टी-२०: वेलिंग्टन- ३१ जानेवारी २०२०

पाचवी टी-२०: माऊंट माउंगानुई- ०२ फेब्रुवारी २०२०

 वनडे मालिका (सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होणार)

पहिली वनडे : हॅमिल्टन – ०५ फेब्रुवारी २०२०

दुसरी वनडे : ऑकलंड       ०८ फेब्रुवारी २०२०

तिसरी वनडे : माऊंट माउंगानुई – ११ फेब्रुवारी २०२०

न्यूझीलंड अ संघाविरुद्ध ३ दिवसाचा सराव सामना: हॅमिल्टन- १४ ते १६ फेब्रुवारी (भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता)

कसोटी मालिका (दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार पहाटे ४.०० वाजता सुरू होणार)

पहिली कसोटी  : २१ ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन

दुसरी कसोटी   : २९ फेब्रुवारी ते ०४ मार्च- ख्राइस्टचर्च

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments