Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeक्रीडाक्रीडामंत्र्यांची घोषण: टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाखांचं...

क्रीडामंत्र्यांची घोषण: टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाखांचं अर्थसहाय्य

पुणे: टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पूर्वतयारीसाठी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा महाराष्ट्राचे क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी केली आहे. शेलार यांच्या उपस्थितीत पुण्याच्या बालेवाडीमध्ये आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी आशीष शेलार यांनी आगामी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत आणि तिरंदाज प्रवीण जाधव या दोनच खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट नक्की झाले आहे. राहीने पिस्टल नेमबाजीत, तर प्रवीणने सांघिक तिरंदाजीत पात्रता निकष गाठला आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिप्मिकमध्ये महाराष्ट्राच्या या दोनच खेळाडूंना पाहण्याची संधी मिळणार आहे.

२४ जुलै २०२० ते ९ ऑगस्ट २०२० दरम्यान जपानची राजधानी तोकीयी या सह्रात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments