Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeक्रीडाविराट-अनुष्काच्या लग्नाचा इटलीत वाजणार 'बॅण्डबाजा'

विराट-अनुष्काच्या लग्नाचा इटलीत वाजणार ‘बॅण्डबाजा’

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे. इटलीमध्ये ९ ते १२ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या शानदार सोहळ्यात ते विवाहबध्द होणार आहेत. दरम्यान, दोघांकडून यावृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

नातेवाईकांची तिकीटे बुक-
विराट आणि अनुष्का या दोघांचे निकटवर्तीय विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्याकरता इटलीला जाण्याची तिकिटे बुक करण्यात आली आहेत. ९ ते ११ डिसेंबर तीन दिवस विवाह सोहळा रंगणार आहे. यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. या विवाह सोहळ्याला बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.
याकरता घेतली सुट्टी-
डिसेंबर महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून वगळण्याची विनंती विराटने बीसीसीआयकडे केली होती. त्याकरता त्याने वैयक्तिक कारण सांगितले होते. या सुट्टीमागे विवाहाचे कारण असावे अशी चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments